एक्स्प्लोर

Ind vs Pak Womens T20 World Cup : पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानला आधी डिवचलं, मग झाला घात! टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्याच सामन्यात शेफाली वर्मासोबत नक्की काय घडलं?, Video

Ind vs Pak Womens T20 World Cup 2026 : क्रिकेट जगतातील दोन प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानचे महिला संघ बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन मैदानावर आमनेसामने आले आहेत.

Ind vs Pak Womens T20 World Cup 2026 : महिला टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील हायव्होल्टेज सामन्याला सुरुवात झाली आहे. क्रिकेट जगतातील दोन प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानचे महिला संघ बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन मैदानावर आमनेसामने आले आहेत. या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने टॉस जिंकून आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एजबेस्टनची खेळपट्टी फलंदाजीसाठी पूरक असल्याचा अंदाज हरमनप्रीतने वर्तवला होता. मात्र, सामन्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये भारतीय संघाला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून खणखणीत सुरुवात करणारी शेफाली पुढच्याच काही चेंडूंमध्ये बाद होऊन माघारी परतली.

पहिल्याच चेंडूवर सिक्स, अन्...

भारतीय डावाची सुरुवात करण्यासाठी शेफाली वर्मा आणि उपकर्णधार स्मृती मानधना ही जोडगोळी मैदानात उतरली होती. पाकिस्तानकडून डावाचे पहिले ओव्हर टाकण्याची जबाबदारी डावखुरी फिरकीपटू सादिया इक्बालकडे होती. सादियाच्या पहिल्याच चेंडूवर शेफाली वर्माने आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत लॉंग-ऑफच्या दिशेने एक गगनचुंबी षटकार ठोकला. भारताला धडाकेबाज सुरुवात मिळणार असेच वाटत होते.

परंतु, हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर पाकिस्तानच्या सादिया इक्बालने कमबॅक केले. तिने पुढचे सलग तीन चेंडू अतिशय अचूक टाकत शफालीला शांत ठेवले. ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर शेफालीने क्रीझमध्ये स्वतःसाठी जागा बनवून पुन्हा एकदा मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, सादियाने चेंडूची गती कमी केली होती. शेफालीच्या बॅटची बाहेरील कट घेऊन चेंडू थेट विकेटकीपर मुनीबा अलीच्या हातात गेला. मुनीबाने कोणतीही चूक न करता सोपा झेल टिपला. 5 चेंडूत 6 धावा करून शेफाली तंबूत परतली.

जेमिमा रॉड्रिग्जही अपयशी, स्मृती अन् हरमनप्रीतने सावरला डाव

शेफाली बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या जेमिमा रॉड्रिग्जलाही आज विशेष काही करता आले नाही. ती अत्यंत संथ खेळली आणि 7 चेंडूंत 1 धाव काढून तस्मिया रुबाबच्या गोलंदाजीवर नतालिया परवेझकडे झेल देऊन बाद झाली. अवघ्या 18 धावांवर भारताचे 2 फलंदाज बाद झाल्यामुळे संघ अडचणीत सापडला होता. दोन झटके लवकर बसल्यानंतर अनुभवी स्मृती मानधना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी भारतीय डावाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. वृत्त लिहिपर्यंत, भारताने 12 ओव्हर्समध्ये 2 विकेट्स गमावून 85 धावा केल्या आहेत.

हे ही वाचा -

क्रीडा जगताला कलंक! जगप्रसिद्ध क्रिकेटपटूने पत्नीला गोळ्या झाडून संपवलं, कोर्टाचा तो एक निकाल अन् सगळेच हादरले

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लॉर्ड्सवर बेन डकेटची ऐतिहासिक खेळी, इंग्लंडने रचला धावांचा डोंगर, विजयासाठी भारतासमोर 388 धावांचं लक्ष्य  
लॉर्ड्सवर बेन डकेटची ऐतिहासिक खेळी, इंग्लंडने रचला धावांचा डोंगर, विजयासाठी भारतासमोर 388 धावांचं लक्ष्य  
Rohit Sharma Retirement: रोहित शर्माच नव्हे, टीम इंडियाचे 'हे' 6 दिग्गजही घेऊ शकतात निवृत्ती; कधीही होऊ शकते मोठी घोषणा
रोहित शर्माच नव्हे, टीम इंडियाचे 'हे' 6 दिग्गजही घेऊ शकतात निवृत्ती; कधीही होऊ शकते मोठी घोषणा
BCCI On Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
Rohit Sharma Retirement: 'रोहित, विराटची गरज नाही, असं भासवण्यासाठी प्रयत्न सुरूयेत?'; आर. अश्विननं गंभीर-अगरकरांना सुनावलं
'रोहित, विराटची गरज नाही, असं भासवण्यासाठी प्रयत्न सुरूयेत?'; आर. अश्विननं गंभीर-अगरकरांना सुनावलं
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Gold Silver Rates: सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
Embed widget