IND vs PAK Playing 11, ICC Champions Trophy 2025: सध्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा (ICC Champions Trophy 2025) पाकिस्तान आणि दुबईत खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेतील हायव्होलटेज सामना म्हणजेच भारत आणि पाकिस्तानचा (India vs Pakistan) सामना रविवारी (23 फ्रेब्रुवारी) रंगणार आहे. दुबईच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तानचा सामना दुपारी 2.30 वाजता खेळवण्यात येईल. 

भारतीय संघाने बांगलादेशला पराभूत करुन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजयी सुरुवात केली. पाकिस्तानला मात्र पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने पाकिस्तानचा पराभव केला. त्यामुळे आता भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यात पाकिस्तानला काहीही करुन विजय मिळवावा लागेल. जर पाकिस्तान संघाने हा सामना गमावला तर त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहोचणे जवळजवळ अशक्य होईल.

भारतीय संघ कोणताही बदल न करता पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरण्याची शक्यता-

भारतीय संघ कोणताही बदल न करता पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरण्याची शक्यता आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताने गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा पाकिस्तानविरुद्ध त्याच संघाला मैदानात उतरवू शकतो.

पाकिस्तान संघात होणार अनेक बदल-

पाकिस्तानबद्दल बोलायचे झाले तर संघात काही बदल होणे निश्चित आहे. सलामीवीर फखर झमान दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी इमाम उल हकचा संघात समावेश झाला आहे. याशिवाय, सौद शकीलचा खराब फॉर्म देखील संघासाठी चिंतेचा विषय आहे.भारताविरुद्ध सौद शकीलच्या जागी यष्टीरक्षक फलंदाज उस्मान खानला संधी मिळू शकते. याशिवाय कामरान गुलाम हा देखील संघात स्थान मिळविण्याचा दावेदार आहे. 

पाकिस्तानविरुद्ध भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि हर्षित राणा.

भारताविरुद्ध पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

इमाम उल हक, उस्मान खान, बाबर आझम, मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि यष्टिरक्षक), सलमान आगा, तय्यब ताहिर / कामरान गुलाम, खुशदिल शाह, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ आणि अबरार अहमद.

संबंधित बातमी:

Champions Trophy Points Table : धावांच्या डोंगराखाली गुदमरला अफगाणिस्तान! 'चोकर्स' समजली जाणारी दक्षिण आफ्रिका पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर