IND vs PAK Semi Final Equation: भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये विश्वचषकाच्या साखळी फेरीत लढत झाली होती. 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत झाली होती, या सामन्यात भारताने पाकिस्तानचा सात विकेट्सने पराभव केला होता. आता विश्वचषक उत्तरार्धाकडे झुकला आहे. रोहित शर्माच्या टीम इंडियाने उपांत्य फेरतील आपले स्थान निश्चित केलेय. आठ सामन्यापैकी आठ विजय मिळवत भारत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. पाकिस्तानचे सेमीफायनलमधील स्थान अद्याप निश्चित झाले नाही. पण पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहचण्याची शक्यता आहे. पाकिस्तान संघ सेमीफायनलमध्ये पोहचल्यास भारतासोबत आमनासामना होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान संघ सेमीफायनलमध्ये पोहचल्यास भारतासोबत आमनासामना होईल.
भारतीय संघ विश्वचषकात आतापर्यंत अजिंक्य आहे. भारत 2023 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला. पाकिस्तानचे उपांत्य फेरीचे तिकीट अद्याप निश्चित झाले नाही. तरी बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानला उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याची संधी आहे. पाहूयात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये पुन्हा आमनासामना कसा होईल, पाहूयात
सेमीफायनलच्या लढती कशा ?
गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असणारा संघ चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या संघासोबत आमनासामना करेल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघामध्ये दुसरा सेमीफायनलचा सामना होणार आहे. भारतीय संघाने गुणतालिकेतील पहिले स्थान निश्चित केलेय. ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्या क्रमांकावर पोहचण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानावर राहण्याची शक्यता आहे. चौथ्या क्रमांकासाठी कोणता संघ असेल, हे अद्याप निश्चित झाले नाही. पण पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये स्पर्धा रंगली आहे.
पाकिस्तान संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला तर चौथ्या क्रमांकापर्यंत पोहचू शकतात. पाकिस्तान, न्यूझीलंड आणि आफगाणिस्तान संघाचे समीफायनलमध्ये पोहचण्याचे चान्सेस जास्त आहेत. या तिन्ही संघाकडे प्रत्येकी आठ आठ गुण आहेत. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांचा एक एक सामना शिल्लक आहे. अफगाणिस्तान संघाचे दोन सामने शिल्लक आहेत.
अफगाणिस्तान संघाने दोन्हीपैकी एकजरी सामना जिंकला तरी न्यूझीलंड आणि पाकिस्तान या संघाला फटका बसू शकतो. अफगाणिस्तान संघाला दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला तर पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघाला फायदा होणार आहे.
न्यूझीलंडचा पुढील सामना श्रीलंकेविरुद्ध आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव झाला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येईल. किंवा हा सामना कोणत्याही कारणास्तव रद्द झाला तर न्यूझीलंडला फक्त एख गुण मिळेल. पाकिस्तानला पुढच्या सामन्यात इंग्लंडचा पराभव करून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करु शकतो.
जर न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव केला तर पाकिस्तानला इंग्लंडविरोधात मोठ्या फरकाने पराभूत करावे लागले. पाकिस्तानला अखेरच्या सामन्यात 130 धावांनी विजय मिळवावा लागेल.
या सर्व समीकरणांनुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात उपांत्य फेरीचा सामना पाहायला मिळू शकतो. मात्र, ही समीकरणे तेव्हाच कामी येतील जेव्हा अफगाणिस्तान आपले दोन्ही सामने हरेल. जर अफगाणिस्तान संघाने एका सामन्यात विजय मिळवला तर नेटरनरेटनुसार चौथा संघ ठरेल.