Ind vs Pak Update : हाय-व्होल्टेज सामन्यात टीम इंडियाचा ‘किलर’ परफॉर्मन्स! पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव

Ind vs Pak Score Update T20 World Cup 2026 : टी-20 विश्वचषकमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना रविवार 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियम येथे खेळला गेला.

Advertisement

किरण महानवर Last Updated: 15 Feb 2026 09:12 PM

पार्श्वभूमी

India vs Pakistan Update T20 World Cup 2026 In Marathi : आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना रविवार, 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियम...More

nd vs Pak Live Update : हार्दिक-बुमराहचा कहर, फक्त 12 चेंडू अन् कॅप्टनसह टॉप ऑर्डर उद्ध्वस्त; पाकिस्तान गुडघ्यावर

हार्दिक पांड्या आणि बुमराह जोडीने पाकिस्तानच्या फलंदाजीचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे.


अवघ्या 12 चेंडूच्या खेळात पाकिस्तानचा कर्णधार आणि टॉप ऑर्डर तंबूत परतले.


हार्दिक पांड्याने डावाच्या पहिल्याच षटकात पाकिस्तानला पहिला आणि मोठा धक्का दिला. सलामीवीर साहिबजादा फरहान याला खातेही उघडता आले नाही.  


बुमराहने डावाच्या दुसऱ्या षटकात सॅम अयुबला (6 धावा) पायचीत (LBW) करत पाकिस्तानला दुसरा धक्का दिला.


बुमराह इथेच थांबला नाही. त्याने आपल्या धारदार गोलंदाजीने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाला (4 धावा) आऊट केले.


फक्त 13 धावांवर 3 महत्त्वाचे गडी गमावल्यामुळे पाकिस्तानचा संघ पूर्णपणे बॅकफूटवर गेला आहे. 


सध्या मैदानात बाबर आझम उभा असून, त्याला साथ देण्यासाठी उस्मान खान मैदानात उतरला आहे.

© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.