Ind vs Pak Update : हाय-व्होल्टेज सामन्यात टीम इंडियाचा ‘किलर’ परफॉर्मन्स! पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव
Ind vs Pak Score Update T20 World Cup 2026 : टी-20 विश्वचषकमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना रविवार 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियम येथे खेळला गेला.
LIVE

Background
India vs Pakistan Update T20 World Cup 2026 In Marathi : आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना रविवार, 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियम येथे रंगणार आहे. स्पर्धेची दमदार सुरुवात केल्यानंतर दोन्ही संघ या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. गतविजेता भारताने आपल्या मोहिमेची सुरुवात अमेरिकेवर विजय मिळवत केली आणि त्यानंतर नामिबियावर तब्बल 93 धावांनी दणदणीत मात केली.
The contest between India and Pakistan at the #T20WorldCup will be available in multiple different languages 🙌
— ICC (@ICC) February 15, 2026
More 👉 https://t.co/IJxaBv4yoJ pic.twitter.com/liLyinnKdD
दुसरीकडे, पाकिस्तानला नेदरलँड्सविरुद्ध सुरुवातीला अडचणींचा सामना करावा लागला, मात्र त्यांनी रोमांचक विजय मिळवत सामन्यावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर अमेरिकेविरुद्धही त्यांनी सहज विजय संपादन करत आत्मविश्वास उंचावला आहे. दोन्ही संघ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असल्याने हा सामना अत्यंत रंगतदार आणि थरारक होण्याची चिन्हे आहेत.
भारत विरुद्ध पाकिस्तान हेड टू हेड रेकॉर्ड (India vs Pakistan Head to Head Record)
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 13 सामने झाले आहेत. त्यापैकी भारताने तब्बल 10 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानला केवळ 3 विजय मिळवता आले आहेत. मागील आशिया कपमध्येही भारताने पाकिस्तानविरुद्ध सलग तीन विजय मिळवले होते.
सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पुन्हा एकदा हा दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, पाकिस्तान संघानेही या स्पर्धेत सलग दोन विजय नोंदवले आहेत. त्यामुळे हा सामना अत्यंत चुरशीचा आणि रोमांचक होण्याची शक्यता आहे.
टी-20 विश्वचषक 2026 साठी भारतीय संघ (Indian squad for T20 World Cup 2026) : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.
टी-20 विश्वचषक 2026 साठी पाकिस्तान संघ (Pakistan squad for T20 World Cup 2026) : सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अश्रफ, फखर जमान, ख्वाजा मोहम्मद नफे, मोहम्मद नवाज, मोहम्मद सलमान मिर्झा, नसीम शाह, साहिबजादा फरहान, सईम अयुब, शाहीन शाह आफ्रिदी, शादाब खान, उस्मान खान आणि उस्मान तारिक.
You don't want to miss these ones 😮💨
— ICC (@ICC) February 15, 2026
Don't miss any of the action. Broadcast details here 📺 https://t.co/NPykWM7qqY pic.twitter.com/3ONzRm9TCw
nd vs Pak Live Update : हार्दिक-बुमराहचा कहर, फक्त 12 चेंडू अन् कॅप्टनसह टॉप ऑर्डर उद्ध्वस्त; पाकिस्तान गुडघ्यावर
हार्दिक पांड्या आणि बुमराह जोडीने पाकिस्तानच्या फलंदाजीचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे.
अवघ्या 12 चेंडूच्या खेळात पाकिस्तानचा कर्णधार आणि टॉप ऑर्डर तंबूत परतले.
हार्दिक पांड्याने डावाच्या पहिल्याच षटकात पाकिस्तानला पहिला आणि मोठा धक्का दिला. सलामीवीर साहिबजादा फरहान याला खातेही उघडता आले नाही.
बुमराहने डावाच्या दुसऱ्या षटकात सॅम अयुबला (6 धावा) पायचीत (LBW) करत पाकिस्तानला दुसरा धक्का दिला.
बुमराह इथेच थांबला नाही. त्याने आपल्या धारदार गोलंदाजीने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाला (4 धावा) आऊट केले.
फक्त 13 धावांवर 3 महत्त्वाचे गडी गमावल्यामुळे पाकिस्तानचा संघ पूर्णपणे बॅकफूटवर गेला आहे.
सध्या मैदानात बाबर आझम उभा असून, त्याला साथ देण्यासाठी उस्मान खान मैदानात उतरला आहे.
Ind vs Pak Live Update : ईशान किशनने वाजवलं पाकिस्ताचं बँड, पण साथीदारांनी सोडली साथ! पाकिस्तानसमोर 176 धावांचं आव्हान
ईशान किशनच्या अर्धशतकाच्या मदतीने भारताने पाकिस्तानसमोर 176 धावांचे लक्ष्य ठेवले.
ईशान किशनने 40 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांसह 77 धावा करत भारताच्या डावाचे नेतृत्व केले.
शिवम दुबेनेही 17 चेंडूत 27 धावा केल्या.
पाकिस्तानकडून उस्मान तारिकने 4 षटकांत 24 धावा देत 1 विकेट घेतला.
टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध भारताची ही सर्वोच्च धावसंख्या आहे.




















