IND vs PAK Final Live Score Asia Cup 2025 : भारताने 9व्यांदा आशिया कप जिंकला! 14 दिवसांत तिसऱ्यांदा पाकिस्तानला हरवले... तिलक अन् कुलदीप चमकले

India vs Pakistan LIVE Updates : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कप 2025 चा ‘महासंग्राम’ रंगणार आहे. दोन्ही संघ दुबईच्या मैदानावर हायव्होल्टेज अंतिम सामन्यात आमनेसामने येणार आहेत.

Advertisement

किरण महानवर Last Updated: 29 Sep 2025 12:07 AM

पार्श्वभूमी

India vs Pakistan LIVE Updates Asia Cup 2025 Final : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कप 2025 चा ‘महासंग्राम’ रंगणार आहे. दोन्ही संघ दुबईच्या मैदानावर हायव्होल्टेज अंतिम सामन्यात आमनेसामने येणार...More

IND vs PAK Final Live Score Asia Cup 2025 : भारताने 9व्यांदा आशिया कप जिंकला! 14 दिवसांत तिसऱ्यांदा पाकिस्तानला हरवले... तिलक अन् कुलदीप चमकले

भारताने पाकिस्तानला हरवून आशिया कपचे विजेतेपद पटकावले आहे. तिलक वर्माने भारतासाठी शानदार कामगिरी केली आणि शेवटपर्यंत टिकून राहून संघाला अभूतपूर्व विजय मिळवून दिला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कुलदीप यादवच्या शानदार गोलंदाजीच्या मदतीने भारताने पाकिस्तानचा डाव 19.1 षटकात 146 धावांत गुंडाळला. लक्ष्याचा पाठलाग करताना तिलकने 53 चेंडूत तीन चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 69 धावा केल्या, ज्यामुळे भारताने 19.4 षटकात पाच गडी गमावून 150 धावा करून सामना जिंकला.

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.