- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Ind Vs Pak LIVE Score : दुबईत अभिषेक शर्माचा तडाखा! टीम इंडियाने पाकिस्तानला सहा विकेट्सने लोळवलं, जाणून घ्या सामन्यात काय घडलं?
India vs Pakistan Asia cup 2025 Match live score : भारत आणि पाकिस्तान संघ आशिया कप 2025 मध्ये पुन्हा अवघ्या एका आठवड्याच्या आत एकदा आमनेसामने येण्यासाठी सज्ज झाला आहेत.
पार्श्वभूमी
India vs Pakistan live Scorecard Updates Asia Cup 2025 Super 4 : भारत आणि पाकिस्तान संघ आशिया कप 2025 मध्ये पुन्हा अवघ्या एका आठवड्याच्या आत एकदा आमनेसामने येण्यासाठी सज्ज झाला...More
आशिया कपच्या सुपर फोर स्टेज सामन्यात पाकिस्तानला सहा विकेट्सने हरवून भारताने विजयी घोडदौड सुरू ठेवली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. साहिबजादा फरहानच्या अर्धशतकाच्या मदतीने पाकिस्तानने 20 षटकांत पाच विकेट्सच्या मोबदल्यात 171 धावा केल्या. प्रत्युत्तर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये शतकी भागीदारी झाली. भारताने 18.5 षटकांत चार विकेट्सच्या मोबदल्यात 174 धावा करून सामना जिंकला.
आशिया कपच्या सुपर फोर स्टेज सामन्यात पाकिस्तानला सहा विकेट्सने हरवून भारताने विजयी घोडदौड सुरू ठेवली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. साहिबजादा फरहानच्या अर्धशतकाच्या मदतीने पाकिस्तानने 20 षटकांत पाच विकेट्सच्या मोबदल्यात 171 धावा केल्या. प्रत्युत्तर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये शतकी भागीदारी झाली. भारताने 18.5 षटकांत चार विकेट्सच्या मोबदल्यात 174 धावा करून सामना जिंकला.
पाकिस्तानने टीम इंडियाला दोन मोठे धक्के दिले आहेत. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला खाते न उघडताच बाद झाला. अभिषेक आणि गिलने भारताला चांगली सुरुवात करून दिली, परंतु पाकिस्तानने सूर्यकुमार यादव आणि गिलच्या विकेट घेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला.
भारताने 9.5 षटकांत 105 धावांवर पहिली विकेट गमावली. शुभमन गिल 28 चेंडूत 47 धावा काढून बाद झाला. गिलला फहीम अश्रफने आऊट केले. भारताला विजयासाठी 60 चेंडूत फक्त 67 धावांची आवश्यकता होती.
अभिषेक शर्माने केवळ 24 चेंडूत त्याचे तिसरे टी-20 अर्धशतक पूर्ण केले. तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे आणि शुभमन गिलसह तो पाकिस्तानवर खूप दबाव आणत आहे. भारतीय उपकर्णधारही अर्धशतकाच्या जवळ आहे.
चौथ्या षटकात अबरार अहमदने 12 धावा दिल्या. चार षटकांनंतर भारताची धावसंख्या एकही बाद 43 आहे. अभिषेक शर्मा 12 चेंडूत 21 धावांवर खेळत आहे, त्याने एक चौकार आणि दोन षटकार मारले आहेत. शुभमन गिल 12 चेंडूत 22 धावांवर खेळत आहे, त्याने चार चौकार मारले आहेत.
पाकिस्तानचा डाव संपला आहे. पाकिस्तानने 20 षटकांत 5 गडी बाद 171 धावा केल्या. पहिल्या 10 षटकांत पाकिस्तानने 1 गडी बाद 91 धावा केल्या होत्या. तर शेवटच्या 10 षटकांत 80 धावा झाल्या. जसप्रीत बुमराहने 4 षटकांत 45 धावा दिल्या. त्याला एकही विकेट मिळाली नाही आणि वरुण चक्रवर्तीही विकेट मिळाली नाही. पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानने सर्वाधिक 58 धावा केल्या. फहीम अशरफ आठ चेंडूंत २० धावा काढून नाबाद राहिला. भारताकडून शिवम दुबेने 33 धावांत दोन गडी बाद केले.
दुबईत टीम इंडियाने पाकिस्तानवर पलटवार केला, शिवम दुबेने साहिबजादा फरहानला बाद करून पाकला चौथा धक्का दिला. सामन्यात फरहानला दोन जीवदान मिळाले होते, पण यावेळी सूर्यकुमार यादवने झेल घेण्यात कोणतीही चूक केली नाही आणि त्याचा डाव संपवला. फरहान 45 चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकारांसह 58 धावा काढून बाद झाला.
कुलदीप यादवने हुसेन तलतला बाद करून पाकिस्तानला तिसरा धक्का दिला. 11 चेंडूत 10 धावा काढून तलत बाद झाला. पण, साहिबजादा फरहान क्रीजवर राहिला आणि मोहम्मद नवाज त्याच्यासोबत आला.
शिवम दुबेने भारताला दुसरा विजय मिळवून दिला. पाकिस्तानने 10.3 षटकांत 93 धावा केल्या तेव्हा त्यांना दुसरा धक्का बसला. साईम अयुब 17 चेंडूत 21 धावा काढून बाद झाला. अखेर अभिषेक शर्माने चित्त्यासारखी हवेत डाईव्ह मारत झेल घेतला.
पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहानने त्याला मिळालेल्या दोन संधींचा पुरेपूर फायदा घेतला आणि 34 चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले.
पॉवरप्लेमध्ये भारताला एक ब्रेकथ्रू मिळाला, तर पाकिस्तानने मागील सामन्यापेक्षा चांगली सुरुवात केली. पहिल्या सहा षटकांमध्ये भारताचे क्षेत्ररक्षण खराब होते, दोन झेल सोडले. सहा षटकांच्या अखेरीस पाकिस्तानने एक बाद 55 धावा केल्या होत्या.
तिसऱ्या षटकात हार्दिक पांड्याने भारताला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला. पाकिस्तानचा सलामीवीर फखर झमानला आऊट केले. संजू सॅमसनने चांगला झेल घेतला. फखर आणि साहिबजादा फरहानने पाकिस्तानला जलद सुरुवात देण्याचा प्रयत्न केला, परंतु हार्दिकने फखरला बाद करून भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला. नऊ चेंडूत तीन चौकारांसह 15 धावा काढून फखर बाद झाला.
सैम अयुब, साहिबजादा फरहान, फखर जमान, सलमान आगा, हुसैन तलत, मोहम्मद हरीस, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.
पाकिस्ताननेही दोन बदल केले. हसन नवाज आणि खुशदिल शाह या सामन्यात खेळत नाहीत.
कर्णधार सूर्यकुमार यादवने भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले. हर्षित राणा आणि अर्शदीप सिंगच्या जागी जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती परतले.
पाकिस्तानविरुद्ध भारताने पहिल्या सुपर फोर सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.
भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप 2025 सामना सोनी स्पोर्ट्स चॅनेलवर थेट पाहू शकता. तर तुम्ही डीडी स्पोर्ट्सवर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना देखील फुकटात थेट पाहू शकता.
फखर जमान, साहिबजादा फरहान, सलमान अली आगा, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), सैम अयुब, खुशदिल शाह, हसन नवाज, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद.
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.
हस्तांदोलनच्या वादानंतर दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर येतील. टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. सुपर फोरमध्ये ही विजयी मालिका सुरू ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. आशिया कप 2025 च्या लीग सामन्यात टीम इंडियाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 9 बाद 127 धावा केल्या.
भारताने 15.5 षटकांत हे लक्ष्य गाठले, फक्त 3 विकेट गमावल्या. आता, पाकिस्तान या पराभवाचा बदला घेण्यासाठी उत्सुक असेल. पण, भारतीय संघ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. 2024 मध्ये टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यापासून, टीम इंडियाने एकही टी-20 मालिका गमावलेली नाही. या काळात, भारताने एकूण 23 सामने खेळले आहेत आणि त्यापैकी फक्त 3 सामने गमावले आहेत.
आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान 20 वेळा आमनेसामने आले आहेत, त्यापैकी 11 वेळा भारताने विजय मिळवला आहे. पाकिस्तानने 6 वेळा विजय मिळवला आहे आणि 3 सामने अनिर्णित राहिले आहेत. भारत आणि पाकिस्तान टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 14 वेळा एकमेकांसमोर आले आहेत, त्यापैकी 11 वेळा भारताने विजय मिळवला आहे आणि 3 वेळा पाकिस्तानने भारताला हरवले आहे.
भारत-पाकिस्तान सुपर-4 सामना रविवार 21 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स 1, सोनी स्पोर्ट्स 3 आणि सोनी स्पोर्ट्स 4 वर उपलब्ध असेल. चाहते सोनी लिव्ह अॅप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकतात. त्याच वेळी, आशिया कप 2025 चे थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्सवर देखील उपलब्ध असेल, परंतु फक्त भारताचे सामने डीडी फ्री डिशवर उपलब्ध असतील. त्यामुळे तुम्ही भारत-पाकिस्तान सामना डीडी स्पोर्ट्सवर फ्री मध्ये पाहू शकता.
- मुख्यपृष्ठ
- क्रीडा
- क्रिकेट Ind Vs Pak LIVE Score : दुबईत अभिषेक शर्माचा तडाखा! टीम इंडियाने पाकिस्तानला सहा विकेट्सने लोळवलं, जाणून घ्या सामन्यात काय घडलं?