The Greatest Rivalry India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्या सामन्याला खूप महत्वं दिलं जातं. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन देशांमध्ये होणाऱ्या सामन्यांमध्ये उत्साह आणि रोमांच शिगेला पोहोचलेला असतो. त्यामुळं क्रिकेटप्रेमींमध्ये हा सामना सर्वाधिक लोकप्रिय आहे. या लोकप्रियतेमुळंचं दोन्ही देशांदरम्यान, कायम अत्यंत तणावाच्या वातावरणात सामना खेळला जातो. जेव्हा दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतात, त्यावेळी क्रिकेट सामन्याच्या व्यतिरिक्त दोन्ही संघातील खेळाडूतही बऱ्याच वेळा वाद झाल्याचं पाहायला मिळालं. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हटलं की क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच असते. भारत आणि पाकिस्तान India vs Pakistan) यांच्यातील लढतीचा रोमांच, उत्साह शब्दात व्यक्त करायचं म्हटलं तरी जमणार नाही. पण याचं पारंपारिक प्रतिस्पर्धीमधील लढतीचा आनंद आता नेटफ्लिक्सवर घेता येणार आहे. होय.. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटच्या मैदानातील थरार नेटफ्लिक्सनं आणला आहे. नेटफ्लिक्सकडून 'द ग्रेटेस्ट रायव्हलरी' नावाची डॉक्यूमेंट्री तयारी करण्यात आली आहे. याचा शानदार टीझर नुकताच लाँच करण्यात आलाय. या टिझरची सोशल मीडियावर चर्चा आहे.
'द ग्रेटेस्ट रायव्हलरी' चा टीझर लाँच -
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना क्रीडा प्रेमींना रोमांचक करतो. सर्वात मोठी लढई 22 यार्डवर पाहायाला जगातील चाहते क्रिकेट स्टेडियमवर येतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना याची देही याची डोळा पाहण्यासाठी अटापिटा करताता. काहींना स्टेडियममध्ये जाण्याची संधी मिळते, तर काहीजण टिव्हीवरच समाधान मानतात. आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अनेक रोमांचक सामने झाले आहेत. त्यामध्ये वाद झाला. हाच सर्व घटनाक्रम नेटफ्लिक्सनं आणला आहे. नेटफ्लिक्सकडून 'द ग्रेटेस्ट रायव्हलरी' चा टीझर लाँच करण्यात आलाय. या टीझरला चाहत्यांकडून प्रतिसाद मिळतोय. नेटफ्लिक्सकडून 'द ग्रेटेस्ट रायव्हलरी'ची रिलिज डेट जाहीर केलेली नाही.
पाहा 'द ग्रेटेस्ट रायव्हलरी' टीझर -
टीझरमध्ये खास काय ?
'द ग्रेटेस्ट रायव्हलरी' च्या टीझरमध्ये कपिल देव यांना विश्वचषक उंचावता दाखवलेय. त्याशिवाय पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खान यांनाही विश्वचषकासह दाखवण्यात आलेय. या टीझरमध्ये सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सहवाग आणि शोएब अख्तर यांच्यातील रायव्हलरीही दाखवण्यातआली आहे.