Ind vs Pak Asian Games 2026: सचिन तेंडुलकरसोबत केलेलं, तेच वैभव सूर्यवंशीसोबत केलं; पाकिस्तानचं कृत्य पाहून कॉमेंटेटर भडकला, आशियाई स्पर्धेत नेमकं काय घडलं?, VIDEO
Ind vs Pak Gold Medal Match Asian Games 2026: वैभव सूर्यवंशीला बाद करताच सॅम अयुबने डिवचणारे सेलीब्रेशन केले.

Ind vs Pak Gold Medal Match Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अंतिम सामन्यात (Gold Medal Match Asian Games 2026) प्रथम फलंदाजी करताना भारताने पाकिस्तानविरुद्ध एकूण 211 धावा (Ind vs Pak) केल्या. शेवटच्या तीन षटकांत शिवम दुबे आणि तिलक वर्मा (Tilak Verma) यांनी आक्रमक फलंदाजी करत धावसंख्येत 59 धावांची भर घातली. पाकिस्तानविरुद्धची ही भारताची आतापर्यंतची सर्वोच्च टी-20 आंतरराष्ट्रीय धावसंख्या ठरली आहे. अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) डावाच्या सुरुवातीलाच आक्रमक पवित्रा घेत 61 धावा ठोकल्या. यामध्ये ज्यामध्ये सात षटकारांचा समावेश होता.
वैभव सूर्यवंशी लवकर बाद झाला असला तरी अभिषेक शर्माने मात्र जोरदार फटकेबाजी केली. सर्वप्रथम अभिषेक शर्माने पाकिस्तानच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. अभिषेकने 28 चेंडूंत 61 धावा केल्या, ज्यामध्ये सात षटकार आणि तीन चौकारांचा समावेश होता.श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांनी मधल्या षटकांत डाव सावरला, परंतु शिवम दुबे आणि तिलक वर्मा यांनी डावाच्या अखेरीस तुफानी फलंदाजी केली. दरम्यान, वैभव सूर्यवंशीने आक्रमक सुरुवात केली होती. वैभवने दोन षटकार ठोकत 9 चेंडूत 15 धावा केल्या. मात्र पाकिस्तनाचा फिरकीपटू सॅम अयुबच्या गोलंदाजीवर वैभव सूर्यवंशी झेलबाद झाला. वैभव सूर्यवंशीला (Vaibhav Sooryavanshi) बाद करताच सॅम अयुबने डिवचणारे सेलीब्रेशन केले. (Ind vs Pak)
वैभवला बाद केल्यानंतर सॅम अयुबचं वादग्रस्त सेलिब्रेशन, VIDEO (Sam Ayub Celebration Vaibhav Sooryavanshi)
तिसऱ्या षटकात सॅम अयुबच्या गोलंदाजीवर वैभवने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, यष्टिरक्षक उस्मान खानने त्याचा झेल घेतला आणि वैभवला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. भारताची धावसंख्या 28 असताना वैभवच्या रूपाने पहिली विकेट पडली. वैभवला बाद केल्यानंतर सॅम अयुबने केलेल्या सेलिब्रेशनने मात्र मैदानावरील वातावरण तापवलं. अयुबने वैभवकडे पाहत लहान बाळ खेळवत असल्याचा इशारा केला. त्याच्या या कृतीची चर्चा सुरू झाली. मात्र, अयुबच्या या सेलिब्रेशनवर वैभवने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तो शांतपणे पॅव्हेलियनच्या दिशेने परतला. तर भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि आशियाई क्रिडा स्पर्धेत समालोचकाची भूमिका निभावणारे विवेक राझदान चांगलेच संतापले. पाकिस्तानने भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला देखील अशाच पद्धतीने डिवचले होते. 16 वर्षांचा असताना सचिन जेव्हा पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरला तेव्हा लहान मुलांच्या पाळण्यासारखी अॅक्शन करण्यात आली होती. शेवटी तोच सगळ्यांचा बाप निघाला, असं विवेक राझदान म्हणाले.
Saim Ayub mocking Vaibhav Sooryavanshi after dismissing him
— 𝙅𝙍 𝟕𝟕 (@GillPrince07) October 3, 2026
And then, in the very same over, Abhishek Sharma smashed him for:
6 4 4 🔥
Blud got belt treatment 😭 pic.twitter.com/AmRjraUT5P
पाकिस्तानविरुद्ध सर्वोच्च धावसंख्या- (Ind vs Pak Asian Games 2026)
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध 211 धावा केल्या. यापूर्वी, पाकिस्तानविरुद्ध भारताची सर्वोच्च टी-20 आंतरराष्ट्रीय धावसंख्या 192 धावा होती. 212 धावांचे लक्ष्य गाठणे पाकिस्तानसाठी सोपे नसेल; कारण टी-20 मध्ये भारताचा पाठलाग करताना त्यांनी केलेली सर्वोच्च धावसंख्या 182 धावा आहे, जी 2022 च्या आशिया चषकादरम्यान नोंदवली गेली होती.
संबंधित बातमी:




















