Ind vs Pak Gold Medal Match Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने सुवर्णपदक (Ind vs Pak Gold Medal Match Asian Games 2026) पटकावलं आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत 3 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुर्वणपदकासाठी सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 19 धावांनी विजय मिळवला. मात्र .या सामन्यादरम्यान पाकिस्तानी गोलंदाज सॅम अयुबने केलेलं सेलिब्रेशन त्याच्याच अंगलट आला आहे. (India vs Pakistan)
भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला (Vaibhav Sooryavanshi) बाद केल्यानंतर, अयुबने 'बेबी सेलिब्रेशन' (हातात बाळ झुलवल्यासारखी कृती) केले. या कृतीमुळे भारतीय चाहत्यांनी नाराजी व्यक्त केलीच, पण आता पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटूही त्याच्या विरोधात गेले आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी सलामीवीर अहमद शहजाद आणि कामरान अकमल यांनी अयुबच्या या वर्तनावर कडक टीका केली असून त्याला चांगलेच धारेवर धरले आहे.
अहमद शहजाद सॅम अयुबवर संतापला- (Ahmad Shahzad On Sam Ayub Celebration Vaibhav Sooryavanshi)
सॅम अयुबच्या सेलिब्रेशनावर पाकिस्तानचा माजी फलंदाज अहमद शहजाद म्हणाला की, तुम्ही लोक काय करत आहात? इथे तुम्ही स्वतःच 'बाळ' बनला आहात. जगाने किंवा विशेषतः भारताने—तुमच्यासोबत असे वागायला हवे होते, कारण जगाने आणि विशेषतः क्रिकेटच्या मैदानात भारताने तुमच्याशी लहान मुलासारखीच वागणूक दिली आहे. तुम्ही त्यांच्याकडून चार-पाच सामने हरला आहात; तुम्ही कोणताही संघर्ष करत नाही, तरीही तुमचे हे नाटक काही संपत नाही, अशी टीका अहमद शहजादने केली.
कामरान अकमल काय म्हणाला? (Kamran Akmal On Sam Ayub)
पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक कामरान अकमल यानेही अयुबच्या वृत्तीबद्दल निराशा व्यक्त केली. आपली कामगिरी काही फारशी चांगली नाही, तरीही सोशल मीडियावर 'कंटेंट' तयार करण्यावरच लक्ष दिले जात आहे. तिथेच सर्व लक्ष केंद्रित आहे. मला वाटते की व्यवस्थापनाने हे समजून घेतले पाहिजे की हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा खेळ आहे; त्यानुसारच वागले पाहिजे. अशा गोष्टी करणे शोभत नाही. सॅम अयुब आता लहान मुलगा राहिलेला नाही. बऱ्याच काळापासून खेळत आहे. त्याने आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे, असा सल्ला कामरान अकमलने दिला.
नेमकं काय घडलं? (Sam Ayub Celebration Vaibhav Sooryavanshi)
वैभव सूर्यवंशीने आक्रमक सुरुवात केली होती. वैभवने दोन षटकार ठोकत 9 चेंडूत 15 धावा केल्या. मात्र पाकिस्तनाचा फिरकीपटू सॅम अयुबच्या गोलंदाजीवर वैभव सूर्यवंशी झेलबाद झाला. वैभव सूर्यवंशीला (Vaibhav Sooryavanshi) बाद करताच सॅम अयुबने डिवचणारे सेलीब्रेशन केले. तिसऱ्या षटकात सॅम अयुबच्या गोलंदाजीवर वैभवने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, यष्टिरक्षक उस्मान खानने त्याचा झेल घेतला आणि वैभवला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. भारताची धावसंख्या 28 असताना वैभवच्या रूपाने पहिली विकेट पडली. वैभवला बाद केल्यानंतर सॅम अयुबने केलेल्या सेलिब्रेशनने मात्र मैदानावरील वातावरण तापवलं. अयुबने वैभवकडे पाहत लहान बाळ खेळवत असल्याचा इशारा केला. त्याच्या या कृतीची चर्चा सुरू झाली. मात्र, अयुबच्या या सेलिब्रेशनवर वैभवने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तो शांतपणे पॅव्हेलियनच्या दिशेने परतला.
भारत आणि पाकिस्तानचा सामना कसा राहिला? (Ind vs Pak Match)
अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांच्या तुफानी अर्धशतकांच्या जोरावर भारताने बोर्डावर 6 बाद 211 धावांचा डोंगर उभारला. टीम इंडियाने दिलेल्या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांच्या भेदक मारासमोर पाकिस्तानचा हसन नवाज एकटा पडला. त्याने 96 धावांची धडाकेबाज खेळी केली, परंतु तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले, तर पाकिस्तानला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
