एक्स्प्लोर

IND vs PAK Asian Games 2026 Final : वैभवला बाद केलं अन् पाक खेळाडूचं वादग्रस्त सेलिब्रेशन; भारत-पाकिस्तान ड्रामा, मैदानावर नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

India VS Pakistan Asian Games 2026 Final : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मधील क्रिकेटचा सुवर्णपदकाचा सामना आज, 3 ऑक्टोबर रोजी खेळला जात आहे.

India VS Pakistan Asian Games 2026 Final : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मधील क्रिकेटचा सुवर्णपदकाचा सामना आज, 3 ऑक्टोबर रोजी खेळला जात आहे. जपानमध्ये रंगणाऱ्या या हायव्होल्टेज सामन्यात भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या सुवर्णपदकाच्या सामन्यात भारताला तिसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला. सॅम अय्युबने युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला बाद करत भारताला मोठा धक्का दिला. वैभवने आक्रमक सुरुवात करत 9 चेंडूत दोन षटकारांच्या मदतीने 15 धावा केल्या.

वैभवला बाद केल्यानंतर सॅम अय्युबचं वादग्रस्त सेलिब्रेशन (Sam Ayub Celebration After Dismissing Vaibhav Sooryavanshi)

तिसऱ्या षटकात सॅम अय्युबच्या गोलंदाजीवर वैभवने फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, यष्टिरक्षक उस्मान खानने त्याचा झेल घेतला आणि वैभवला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. भारताची धावसंख्या 28 असताना वैभवच्या रूपाने पहिली विकेट पडली. वैभवला बाद केल्यानंतर सॅम अय्युबने केलेल्या सेलिब्रेशनने मात्र मैदानावरील वातावरण तापवलं. अय्युबने वैभवकडे पाहत लहान बाळ खेळवत असल्याचा इशारा केला. त्याच्या या कृतीची चर्चा सुरू झाली. मात्र, अय्युबच्या या सेलिब्रेशनवर वैभवने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तो शांतपणे पॅव्हेलियनच्या दिशेने परतला.

दुसऱ्या षटकात वैभव-अभिषेकची धडाकेबाज फटकेबाजी

याआधी दुसऱ्या षटकात वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांवर चांगलाच हल्ला चढवला होता. दोघांनी मिळून या षटकात तब्बल 24 धावा वसूल केल्या. वैभवने दोन षटकार ठोकले, तर अभिषेक शर्माने एक षटकार आणि एका चौकारासह धावांचा वेग वाढवला. वैभव बाद झाल्यानंतर आता अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन भारताचा डाव पुढे नेत आहेत. सुवर्णपदकाच्या या महत्त्वाच्या सामन्यात भारतीय फलंदाजांकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा आहे.

टीम इंडियाची प्लेइंग-11 :

वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), इशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह.

हे ही वाचा - 

IND vs PAK Asian Games 2026 Final : भारताने फक्त 1 वेगवान गोलंदाज उतरवला; पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाची चक्रावणारी Playing XI, जपानमध्ये गोल्डमेडलसाठी हायव्होल्टेज सामना

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
Ind vs NZ T20 Series: भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती IN...; न्यूझीलंविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी जाहीर केला टीम इंडियाचा चक्रावणारा संघ
भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती IN...; न्यूझीलंविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी जाहीर केला टीम इंडियाचा चक्रावणारा संघ
IND vs WI 1st T20 : श्रेयस अय्यरचं पहिलं शतक अन् थेट वेस्ट इंडिजचा पाडला फडशा! टीम इंडियाने 32 चेंडू राखून सामना जिंकला
श्रेयस अय्यरचं पहिलं शतक अन् थेट वेस्ट इंडिजचा पाडला फडशा! टीम इंडियाने 32 चेंडू राखून सामना जिंकला
IND vs WI 1st T20I Score : टीम इंडियाचा 8 विकेट्सनी दणदणीत विजय
टीम इंडियाचा 8 विकेट्सनी दणदणीत विजय
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget