IND VS PAK Asia Cup U19 Final Celebration Video: अंडर-19 आशिया कप 2026 (Under-19 Asia Cup 2026) च्या अंतिम सामन्यात भारताच्या अंडर-19 संघाने पाकिस्तानचा 1 विकेट्स राखून थरारक पराभव केला आणि विजेतेपद पटकावले. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 9 बाद 337 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 50 षटकांच्या शेवटच्या चेंडूवर 9 विकेट गमावत 339 धावा केल्या. त्यामुळे भारताने एका विकेटने हा सामना जिंकत पाकिस्तानकडून गटसाखळीतील पराभवाचा वचपा काढला.
सामना जिंकताच टीम इंडियाचं आक्रमक सेलिब्रेशन, यशवीर पाकिस्तानी खेळाडूच्या समोर नको नको ते बोलला, VIDEO:
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंडर-19 आशिया कप 2026 चा अंतिम सामना अत्यंत थरारक झाला. ओमानमधील अल अमेरात क्रिकेट मैदानावर शनिवारी (14 नोव्हेंबर) खेळल्या गेलेल्या या महामुकाबल्यात भारतीय युवा संघाने पाकिस्तानचा 1 विकेटने पराभव केला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताने 338 धावांचे आव्हान यशस्वीपणे पूर्ण केले आणि आशिया कपच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. दरम्यान, विजयासाठी शेवटच्या षटकात 8 धावांची गरज असताना आणि 9 गडी बाद असताना भारतीय फलंदाजांनी अखेरच्या चेंडूवर सामना जिंकून दिला. विजयी धाव पूर्ण होताच संपूर्ण भारतीय संघाने मैदानात धाव घेत एकमेकांना मिठी मारली आणि जल्लोष केला. भारतीय खेळाडू मनल चौहान आणि मोहित अल्वा यांच्यासह संपूर्ण संघाच्या आक्रमक सेलिब्रेशनचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या दरम्यान, यशवीर गौर पाकिस्तानचा यष्टिरक्षक हमझा झहूर याच्या जवळ जाऊन ओरडून आनंद साजरा करताना दिसला. यावेळी यशवीर गौरने पाकिस्तानच्या खेळाडूला नको नको ते सुनावलं आणि आक्रमक सेलीब्रेशन केले. आर्यन सावसानी आणि कुशाग्र ओझा यांनी विजयाचा नायक असलेल्या मोहितला आपल्या खांद्यावर उचलून घेतले.
भारताची दमदार फलंदाजी; लक्ष्याचा शेवटच्या चेंडूवर यशस्वी पाठलाग- (Ind vs Pak Final Match)
338 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळाली. सलामीवीर आर्यवीर सेहवाग आणि कर्णधार लक्ष्य राजेश रायचंदानी यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांचा सामना करत महत्त्वपूर्ण भागीदारी केली.आर्यवीर सेहवागने 58 धावांची शानदार खेळी केली. तर कर्णधार लक्ष्य रायचंदानीने 101 चेंडूंमध्ये 80 धावा करत संघाच्या विजयाचा पाया रचला. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार मारले. त्यानंतर भारतीय फलंदाजीमध्ये काही विकेट झटपट पडल्या आणि सामना पाकिस्तानच्या बाजूने झुकताना दिसत होता. मात्र, भारतीय युवा खेळाडूंनी हार मानली नाही. मोहम्मद उल्वाने नाबाद 49 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर मनाल चौहानने 47 धावा करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अखेर शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर भारताने विजयासाठी आवश्यक धावा पूर्ण केल्या आणि पाकिस्तानचा 1 विकेटने पराभव केला.
भारतविरुद्ध पाकिस्तानचा फायनल सामना कसा राहिला? (IND VS PAK Asia Cup U19 Final)
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 50 षटकांत 9 बाद 337 धावा केल्या. यात उस्मान खानने 107 धावा (111 चेंडू), तर अब्दुल कादिरने 80 धावांची (54 चेंडू) तुफान खेळी केली. भारताकडून काव्या पटेलने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. 338 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ अडचणीत सापडला होता. मात्र, आर्यवीर सेहवागने 58 धावांची खेळी केली, तर अखेरीस मनाल चौहान (47 धावा, 32 चेंडू) आणि मोहित उल्वा (नाबाद 49 धावा, 26 चेंडू) यांनी शेवटच्या षटकांत शानदार भागीदारी करत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. शेवटच्या षटकात विजयासाठी 8 धावांची गरज असताना, टीम इंडियाने 9 गडी गमावूनही थरारकपणे शेवटच्या चेंडूवर लक्ष्य गाठले.
