IND vs NZ Final  T20 World cup 2026 Final  :  टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ Final  T20 World cup 2026 Final) यांच्यात रविवारी म्हणजे 8 मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या फायनल सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा कर्णधार मिशेल सँटनर आणि भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु झालं आहे. पत्रकार परिषदेत मिशेल सँटनरचं चिथावणीखोर वक्तव्य केलं होतं. त्याच्या वक्तव्याला सूर्यकुमार यादव चोख प्रत्युत्तर दिलं आहे. 

Continues below advertisement

नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव? 

न्यूझीलंडचा कर्णधार मिशेल सँटनर याच्या वक्तव्यावर बोलताना कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की, प्रत्येकजण तेच सांगत आहे. त्यांनी काहीतरी नवीन घेऊन यावे, असे प्रत्युत्तर यादवने दिले. सूर्यकुमार यादव म्हणाला की, घरच्या चाहत्यांसमोर विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणे हा एक खास अनुभव आहे. संघातील प्रत्येक सदस्य या क्षणाबद्दल उत्साहित आहे. सूर्याने सांगितले की, संघ उत्साहित आहे आणि विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी सज्ज आहे.

मिचेल सँटनर काय म्हणाला?

2026  च्या टी20  विश्वचषकाचा अंतिम सामना 8 मार्च रोजी खेळवला जाणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या जेतेपदाच्या लढतीपूर्वी, दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे. अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर यांनी सांगितले की त्यांचे ध्येय भारतीय चाहत्यांना शांत करणे आहे. त्यांनी सांगितले की टी20 क्रिकेट अनिश्चिततेने भरलेले आहे. आम्ही उत्कृष्ट कामगिरी करत राहिले तर कोणत्याही संघाला हरवू शकतात. निःसंशयपणे भारतीय संघावर अंतिम सामना जिंकण्याचा आणि त्यांच्या घरच्या चाहत्यांसमोर ट्रॉफी जिंकण्याचा दबाव असणार आहे. पत्रकार परिषदेत बोलताना मिचेल सँटनर म्हणाला की, टी 20 विश्वचषक जिंकण्यासाठी आम्ही काही हृदय तोडण्यास मागेपुढे पाहणार नाही. सँटनरच्या म्हणण्याचा उद्देश असा होता की, टी20 विश्वचषक ट्रॉफी जिंकण्यासाठी तो भारतीय चाहत्यांचे मन मोडण्यास मागेपुढे पाहणार नाही. मिशेल सँटनरने हे देखील मान्य केले की अंतिम सामन्यात न्यूझीलंडला विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जाणार नाही, परंतु त्यांचा संघ कोणतीही कसर सोडणार नाही. ट्रॉफी उचलताना काही चाहत्यांचे मन तोडण्यास त्यांना हरकत नाही असे सँटनर म्हणाले.

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

T20 WC : फायनलपूर्वी सँटनरची धमकी, अहमदाबादमध्ये 140 कोटी भारतीयांची धडधड वाढवणार