India VS New Zealand Final T20 World Cup 2026 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-20 वर्ल्ड कप 2026 चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील अंतिम सामन्यात सर्वोच्च धावसंख्या उभारली. भारताने 5 विकेट्सवर एकूण 255 धावा केल्या आहेत. टीम इंडियाकडून संजू सॅमसनने 89 धावांची इनिंग खेळली. तर इशान किशनने 54 आणि अभिषेक शर्माने 52 धावा केल्या.
टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोच्च पॉवरप्ले स्कोअर
न्यूझीलंडविरुद्धच्या या अंतिम सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाच्या डावाची सुरुवात संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी केली. दोन्ही खेळाडूंनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांची चांगलीच फटकेबाजी केली. भारताने टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोच्च पॉवरप्ले स्कोअर केला. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांच्यात पहिल्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी झाली.
भारताची धमाकेदार सुरुवात
पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाला अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी शानदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या 43 चेंडूत 98 धावांची तुफानी भागीदारी करत किवी गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. या भागीदारीनंतर भारतीय फलंदाजांनी मागे वळून पाहिलंच नाही. भारताला दुसरा धक्का 203 धावांवर बसला, जेव्हा संजू सॅमसन बाद झाले. त्याआधी संजू सॅमसन आणि ईशान किशन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 48 चेंडूत 105 धावांची जबरदस्त भागीदारी उभारली आणि न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर दबाव वाढवला.
यानंतर थोड्या वेळासाठी धावगती मंदावली. कर्णधार सूर्यकुमार यादव मात्र खातेही न उघडता बाद झाले. तर हार्दिक पांड्यालाही मोठी खेळी करता आली नाही, त्याने 13 चेंडूत 18 धावा केल्या. मात्र शेवटी शिवम दुबेने जोरदार फिनिश दिला. दुबेनं फक्त 8 चेंडूत 28 धावा ठोकत प्रेक्षकांना रोमांचित केलं.
किवी गोलंदाजांची जबरदस्त धुलाई
न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्यूसन सर्वात महागडे ठरला. त्याने 2 षटकांत 48 धावा दिल्या. याशिवाय रचिन रवींद्र याने 2 षटकांत 32 धावा खर्च केल्या आणि पण 1 विकेट मिळाली. तर जेकब डफी याने 3 षटकांत 42 धावा, जेम्स नीशम यांनी 4 षटकांत 45 धावा दिल्या. नीशमने मात्र चांगली कामगिरी करत 3 विकेट्स घेतल्या. किवी कर्णधार मिचेल सॅन्टनर याने 3 षटकांत 33 धावा दिल्या.
हे ही वाचा -
