Ind vs Nz Final Abhishek Sharma T20 World Cup : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे आज आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चा अंतिम सामना टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. या सामन्यात भारताने जोरदार कामगिरी केली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताना 255 धावांचा पल्ला गाठला आहे. यामध्ये संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मानं जोरदार प्रदर्शन केलं आहे. अभिषेख शर्मानं जलद अर्धसतक करत विक्रम केला आहे. शर्माच्या खेळीचं भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने कौतुक केलं आहे. अंतिम सामन्यात त्याने एका महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याच्या या खेळीने विश्वास सार्थ ठरवला आहे. तो छान खेळला अशा शब्दात तेंडूलकरने कौतुकाची थाप टाकली आहे.
अभिषेक शर्मानं शानदार खेली केली आहे. त्याच्या या खेळीच सचिन तेंडूलकरने कौतकु केलं आहे. अभिषेक शर्मासाठी ही स्पर्धा सोपी नव्हती, पण संघाने त्याच्या क्षमतेवर विश्वास दाखवला. अंतिम सामन्यात त्याने एका महत्त्वपूर्ण खेळीने तो विश्वास सार्थ ठरवला, तो छान खेळल्याचे सचिन म्हणाला. इशान किशनने डावाला खरी गती दिली आणि संजू सॅमसनने त्याची विश्वासार्ह धावसंख्या सुरू ठेवल्याचे सचिन तेंडूलकरने म्हटले आहे. अभिषेक शर्मानं 21 चेंडूत 52 धांवाची वादळी खेळी केली. तर 18 चेंडूत अर्धशतक झळकावत विक्रम केला आहे.
संजू खूप हुशारीने फलंदाजी करत आहे, कोणावर हल्ला करायचा आणि कोणाचा बचाव करायचा हे त्याला माहिती आहे. इशान किशनने उत्कृष्ट फलंदाजीचा वेग दाखवला आहे आणि काही अविश्वसनीय शॉट्स खेळले आहेत. 275 धावा शक्य आहेत असे दिसते, हा एक उत्तम धावसंख्या असेल असे तेंडूलकरने म्हटले आहे.
अभिषेक शर्माने अंतिम सामन्यात तीन मोठे विक्रम केले
अभिषेक शर्माने अंतिम सामन्यात तीन मोठे विक्रम मोडत इतिहास रचला, सर्वात जलद अर्धशतक झळकावले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात अभिषेक शर्माने 18 चेंडूत अर्धशतक झळकावले. या डावात त्याने तीन मोठे विक्रम प्रस्थापित केले.
भारताचे सलामीवीर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा अंतिम सामन्यात इतिहास रचला. दोघांनी मिळून टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये पहिल्यांदाच 50 धावांची सलामी भागीदारी करत नवा विक्रम आपल्या नावावर केला. सॅमसन आणि अभिषेक यांनी किवी संघाच्या नव्या चेंडूच्या गोलंदाजांवर आक्रमण चढवत फक्त चार षटकांत 50 धावांची भागीदारी पूर्ण केली. याआधी टी-20 वर्ल्ड कप फायनलमधील सर्वात मोठी सलामी भागीदारी 48 धावा होती. हा विक्रम 2009 मध्ये पाकिस्तानच्या कामरान अकमल आणि शहजैब हसन यांनी श्रीलंकेविरुद्ध केला होता. तर भारतीय जोडीचा यापूर्वीचा सर्वोत्तम विक्रम 25 धावांचा होता. 2007 च्या फायनलमध्ये गौतम गंभीर आणि युसुफ पठाण यांनी पाकिस्तानविरुद्ध ही भागीदारी केली होती.
महत्वाच्या बातम्या: