India won the T20 World Cup 2026 : टी-20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा मोठा पराभव केला आहे. भारतानं सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. संजू सॅमसहनसह अभिषक शर्मा, शिवम दुबे इशान किशन यांना शानदार प्रदर्शन केल्यामुळं  भारताला 255 ही मोठी धावसंख्या अभारता आली. या धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 159 धावांवर आटोपला. दरम्यान, भारतीय संघाच्या विजयानंतर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षावर होत आहे. भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने खास शब्दात भारतीय संघाचं कौतुक केलं आहे. पुन्हा एकदा चॅम्पियन! अहमदाबादमध्ये अंतिम सामन्यात मिळालेला विजय हा अभूतपूर्व असल्याचं कोहलीनं म्हटलं आहे. 

Continues below advertisement

नेमकं काय म्हणाला विराट कोहली? 

पुन्हा एकदा चॅम्पियन. हमदाबादमध्ये अंतिम सामन्यात मिळालेला विजय हा अभूतपूर्व असल्याचे कोहलीनं म्हटलं आहे. संपूर्ण स्पर्धेत दबावाखाली असलेल्या मुलांनी उत्तम खेळ दाखवला. या प्रतिभावान खेळाडूंच्या जवळपासही कोणीही येऊ शकले नाही असं म्हणत कोहलीनं संघातील खेळाडूंचं कौतुक केलं आहे. या अद्भुत कामगिरीचा भाग असल्याबद्दल भारतीय संघाच्या संपूर्ण व्यवस्थापन आणि संपूर्ण सपोर्ट स्टाफ ग्रुपचे अभिनंदन. ते खरोखरच पात्र आहे. जय हिंद इडिया असं विराट कोहलीनं म्हटलं आहे. 

अभिषेकसह संजू सॅमसनचं तांडवं तर बुमराह आणि पटेलची जादू

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे आज आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चा अंतिम सामना  भारतानं जिकंला.  यामध्ये संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मानं जोरदार प्रदर्शन केलं आहे. अभिषेक शर्मानं जलद अर्धसतक करत विक्रम केला आहे. शर्माच्या खेळीचं भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने कौतुक केलं आहे. अभिषेक शर्मानं 21 चेंडूत 52 धांवाची वादळी खेळी केली. तर 18 चेंडूत अर्धशतक झळकावत विक्रम केला आहे. सॅमसनने न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात 89 धावांची वादळी खेळी केली. टी 20 विश्वचषकातील सलग तीन सामन्यात 50 च्या वर धावा करणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. ईशान किशननेही जोरदार प्रदर्शन केलं. त्याने 25 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह 54 धावा केल्या. तर शिवम दुबेने 8 बॉलमध्ये 26 धावांची वादळी खेळी केली. न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात जसप्रीत बुमराह धमाका आणि अक्षय पटेलच्या फिरकीची जादू चालली. बुमराहनं 4 षटकात फक्त 15 धावात 4 विकेट घेतल्या. तर दुसऱ्या बाजूला अक्षर पटेलने 3 षटकात  27 धावा देत 3 विकेट घेतल्या

विश्वचषकात तीन वेळा 250 किंवा त्याहून अधिक धावा करणारा भारत जगातील पहिला देश

2026  च्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 255 धावा केल्या. टीम इंडियाकडून संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांनी अर्धशतके झळकावली. सॅमसनने 89 धावा करत संघाचा सर्वाधिक धावा काढल्या. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील हा भारताचा दुसरा सर्वोच्च आणि टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या आहे. टी-20 विश्वचषकात तीन वेळा 250 किंवा त्याहून अधिक धावा करणारा भारत जगातील पहिला देश बनला आहे.

जगात फक्त पाच वेळा एका संघाने एका डावात 250 किंवा त्याहून अधिक धावा केल्या

जगात फक्त पाच वेळा एका संघाने एका डावात २५० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. या पाचपैकी तीन वेळा टीम इंडियाने हे साध्य केले आहे. टी-20 विश्वचषक सामन्यात तीन वेगवेगळ्या वेळी 250+ धावा करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. टीम इंडियाची ही कामगिरी देखील विशेष आहे कारण भारतीय संघाने एकाच विश्वचषकात तीन वेळा 250 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला