India Win T20 World Cup 2026 : टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात टी-20 विश्वचषक 2026 चा अंतिम सामना अहमदाबादमध्ये पार पडला. या सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा मोठा पराभव करत 2026 चा टी-20 विश्वचषकावर नाव कोरले आहे. या सामन्यात भारतानं बलाढ्य असा 255 धावांचा डोंगर उभा केला होता. या बदल्यात न्यूझीलंडला 159 धावा करता आल्या. भारतानं तब्बल 96 धावांची न्यूझीलंडचा पराभव केला. भारताकडून अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे यांनी वादळी खेळी केली आहे. तर दुसऱ्या बाजूला अक्षर पटेल, बुमराह, हार्दिक पांड्याने चांगली गोलंदाडी केली. यामुळे भारतीय संघानं मोठा विजय मिळवला.
भारतीय संघाच्या विजयाची कारणे काय?
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात टी-20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात भारतानं न्यूझीलंडवर मोठा विजय मिळवला आहे. या विजयामध्ये सर्वाचंच मोठं योगदान आहे. विजयाची कारणे काय आहेत, याबाबतची माहिती पाहुयात.
1. फायनल सामन्यात अभिषेक शर्माची वादळी खेळी
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे आज आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चा अंतिम सामना भारतानं जिकंला. या सामन्यात भारताने जोरदार कामगिरी केली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताना 255 धावांचा पल्ला गाठला होता. यामध्ये संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मानं जोरदार प्रदर्शन केलं आहे. अभिषेक शर्मानं जलद अर्धसतक करत विक्रम केला आहे. शर्माच्या खेळीचं भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने कौतुक केलं आहे. अभिषेक शर्मानं 21 चेंडूत 52 धांवाची वादळी खेळी केली. तर 18 चेंडूत अर्धशतक झळकावत विक्रम केला आहे.
2. संजू सॅमसनचा पुन्हा एकदा तांडव
अभिषेक शर्मानंतर, संजू सॅमसनने 2026 च्या टी-20 विश्वचषकात इतिहास रचला. सॅमसनने न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात 89 धावांची वादळी खेळी केली. टी 20 विश्वचषकातील सलग तीन सामन्यात 50 च्या वर धावा करणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने विरोट कोहलीची बरोबरी केली आहे.
3. ईशान किशन अन् शिवम दुबेचा तडाका
ईशान किशननेही जोरदार प्रदर्शन केलं. त्याने 25 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह 54 धावा केल्या. तर शिवम दुबेने 8 बॉलमध्ये 26 धावांची वादळी खेळी केली. त्यामुळं बारतीय संघाला 255 धावांपर्यंत मजल मारता आली. शिवम दुबेने 3 चौकार आणि 2 षटकार मारले.
4. बुमराहचा धमाका, अक्षय पटेलच्या फिरकीची जादू
न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात जसप्रीत बुमराह धमाका आणि अक्षय पटेलच्या फिरकीची जादू चालली. बुमराहनं 4 षटकात फक्त 15 धावात 4 विकेट घेतल्या. तर दुसऱ्या बाजूला अक्षर पटेलने 3 षटकात 27 धावा देत 3 विकेट घेतल्या. त्याचबरोबर हार्दीक पांड्यासह अभिषेख शर्मा आणि वरुन चक्रवर्तीने प्रत्येकी 1 विकेट घेतली. सर्वच गोलंदाजांनी चांगलं प्रदर्शन केलं. त्यामुं भारताला ऐतिहासीक विदय मिळवता आहे.
महत्वाच्या बातम्या: