एक्स्प्लोर

IND vs NZ Final : देव न करो पण दुबईत काही अनर्थ घडला अन् फायनल सामना रद्द झाला, तर कोण होणार चॅम्पियन? जाणून घ्या ICCचा नियम

India vs New Zealand Champions Trophy 2025 Final : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना रविवार 9 मार्च रोजी खेळला जाणार आहे.

IND vs NZ Champions Trophy 2025 Final : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना रविवार 9 मार्च रोजी खेळला जाणार आहे. हा विजेतेपदाचा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. हा स्पर्धेचा नववा हंगामा आहे, जो पाकिस्तान आणि दुबईमध्ये खेळला जात आहे. भारत अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे जेतेपदाचा सामना दुबईमध्ये खेळला जात आहे. 

पाकिस्तानमध्ये पावसामुळे स्पर्धेतील अनेक सामने रद्द करण्यात आले होते, परंतु दुबईमध्ये अद्याप असे झालेले नाही. पावसाची शक्यता असली तरी, खेळात अद्याप व्यत्यय आलेला नाही. दुबईत भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ शेवटच्या साखळी सामन्यात एकमेकांशी भिडले होते, जिथे टीम इंडियाने किवी संघाचा पराभव केला होता. 

जर पावसामुळे सामना रद्द झाला तर कोण होणार विजेता? 

दुबईमध्ये आतापर्यंत पावसामुळे सामना व्यत्यय आणला नसला तरी, जर फायनल सामन्यात पाऊस पडला आणि मॅच रद्द करावी लागली, तर अशा परिस्थितीत कोणत्या संघाला विजेता घोषित केले जाईल? याबाबत आयसीसीचा नियम अगदी स्पष्ट आहे. जर अंतिम सामन्यादरम्यान पाऊस पडला तर षटकांची संख्या कमी करून सामना खेळवता येईल. आयसीसीच्या नियमांनुसार, अंतिम सामन्यात किमान 20 षटके खेळणे आवश्यक आहे. प्रत्येक संघाला 20-20 षटके दिली जातील. पावसामुळे प्रभावित झालेल्या अंतिम सामन्यांमध्ये षटकांची कपात नियोजित वेळेनंतर सुरू होते.

रविवारी दुबईतील हवामानाबद्दल बोलायचे झाले तर, AccuWeather च्या अहवालानुसार 9 मार्च रोजी दुबईमध्ये पावसाची शक्यता नाही. आणि जर पावसामुळे तरीही खेळवता आला नाही तर सामना राखीव दिवशी पूर्ण होईल. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यासाठी 10 मार्च हा राखीव दिवस ठेवला आहे.

सुपर ओव्हरमध्ये होणार चॅम्पियनचा निर्णय 

जर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना अनिर्णित किंवा बरोबरीत सुटला, तर चॅम्पियन म्हणजेच विजेता सुपर ओव्हरमध्ये ठरवला जाईल. सुपर ओव्हरच्या नियमांनुसार, दोन्ही संघांना प्रत्येकी एक षटक खेळण्याची संधी मिळते.

न्यूझीलंडविरुद्ध 25 वर्षांचा जुना हिशोब चुकता करणार टीम इंडिया?

भारतीय संघाने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात बांगलादेश आणि नंतर पाकिस्तानला हरवले. यानंतर, गट टप्प्यातील शेवटच्या सामन्यात त्यांनी न्यूझीलंडला पराभूत केले.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात, भारत आणि न्यूझीलंडचे संघ दुसऱ्यांदा अंतिम फेरीत आमनेसामने येत आहेत. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत यापूर्वी 2000 मध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले होते, ज्यामध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता, आता त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे.

पावसाचा टीम इंडियाला बसला आहे दणका!
 
भारतीय संघाला अंतिम सामन्यात पावसाचा दणका बसला आहे. 2002 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि श्रीलंका यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण पावसामुळे अंतिम सामना होऊ शकला नाही आणि नंतर आयसीसीच्या नियमांनुसार भारत आणि श्रीलंका यांना संयुक्त विजेते घोषित करण्यात आले.

भारत आणि न्यूझीलंड संघ

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग.

न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, काइल जेमिसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), डॅरिल मिचेल, विल ओ'रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, नाथन स्मिथ, केन विल्यमसन, विल यंग, ​​जेकब डफी.

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shubhman Gill On Rohit Sharma Run Out Ind vs Afg 1st ODI: रनआऊट झाल्यानंतर रोहित शर्मा रागवला होता का?; शुभमन गिल हसत हसत म्हणाला....
रनआऊट झाल्यानंतर रोहित शर्मा रागवला होता का?; शुभमन गिल हसत हसत म्हणाला....
Vaibhav Sooryavanshi : दोन सामने फ्लॉप, अन् आता...; वैभव सूर्यवंशीच्या पुढच्या सामन्याबाबत मोठी अपडेट; कधी, कुठे अन् कोणाविरुद्ध? जाणून घ्या A टू Z
दोन सामने फ्लॉप, अन् आता...; वैभव सूर्यवंशीच्या पुढच्या सामन्याबाबत मोठी अपडेट; कधी, कुठे अन् कोणाविरुद्ध? जाणून घ्या A टू Z
Ind vs Afg 1st ODI Live Update : धर्मशाळेत वरुणराजाची 'धो-धो' बॅटिंग; ना नाणेफेक, ना खेळपट्टीचा अंदाज; रोहित शर्मासह दोन्ही संघांचे डोळे आकाशाकडे, जाणून घ्या Live अपडेट्स
धर्मशाळेत वरुणराजाची 'धो-धो' बॅटिंग; ना नाणेफेक, ना खेळपट्टीचा अंदाज; रोहित शर्मासह दोन्ही संघांचे डोळे आकाशाकडे, जाणून घ्या Live अपडेट्स
Ind VS Afg 1st ODI Live Update : पहिल्या वनडेआधी वाईट बातमी; धर्मशालेत काळे ढग, भारत-अफगाणिस्तान होणार रद्द?, जाणून घ्या अपडेट्स
पहिल्या वनडेआधी वाईट बातमी; धर्मशालेत काळे ढग, भारत-अफगाणिस्तान होणार रद्द?, जाणून घ्या अपडेट्स

व्हिडीओ

Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव
Women Power : महिलांनी घेतला निर्धार अन् बदललं गावाचं चित्र; 'महिला शक्ती कमांडो'ची यशोगाथा | Special Report
Jamun & Drought : जांभळाचा सडा आणि दुष्काळाचा इशारा? निसर्ग काय सांगतोय? | Special Report
Crime Patrol Style Theft Special Report : 'क्राईम पेट्रोल' पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray Shivsena UBT MP Meeting Mumbai: एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा, दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी आज बोलावली खासदारांची बैठक; कोणकोण उपस्थित राहणार?
एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा, दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी आज बोलावली खासदारांची बैठक; कोणकोण उपस्थित राहणार?
Rohit Pawar Protest : रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, तिसऱ्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार; वडील राजेंद्र पवार म्हणाले, 'मी रोहितचा बाप असलो तरी....',
रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, तिसऱ्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार; वडील राजेंद्र पवार म्हणाले, 'मी रोहितचा बाप असलो तरी त्याला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलंय',
India vs Afghanistan, 1st ODI: टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
Rohit Sharma Video: रोहित शर्माचा दुर्दैवाचा फेरा सुरुच, दुखापतीतून सावरून आला, पहिल्याच ओव्हरमध्ये मनगटाच्या वेदनेनं तळमळला, पुन्हा उभा राहिला, पण जम बसण्यापूर्वीच रन आऊटने घात केला
Video: रोहित शर्माचा दुर्दैवाचा फेरा सुरुच, दुखापतीतून सावरून परतला, पहिल्याच ओव्हरमध्ये मनगटाच्या वेदनेनं तळमळला, पुन्हा उभा राहिला, पण जम बसण्यापूर्वीच रन आऊटने घात केला
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी
लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी
India vs Afghanistan, 1st ODI: अफगाणिस्तानचे टीम इंडियासमोर 195 धावांचे आव्हान; गुरनूर ब्रार अन् हर्ष दुबे पदार्पणातच 3-3 विकेट घेत चमकले; गुरबाजने 48 चेंडूत शतक ठोकत 21 वर्षांचा विक्रम मोडला
अफगाणिस्तानचे टीम इंडियासमोर 195 धावांचे आव्हान; गुरनूर ब्रार अन् हर्ष दुबे पदार्पणातच 3-3 विकेट घेत चमकले; गुरबाजने 48 चेंडूत शतक ठोकत 21 वर्षांचा विक्रम मोडला
देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा
देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा
Embed widget