एक्स्प्लोर

IND vs NZ Final : टीम इंडियाने वनडे सामन्यात सलग 15व्यांदा हरला टॉस , रोहित शर्माने फायनलसाठी 'या' 11 खेळाडूंवर दाखवला विश्वास, न्यूझीलंडचाही तगडा संघ मैदानात

IND vs NZ Champions Trophy 2025 Final : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना 9 मार्च रोजी दुबई येथे खेळला जात आहे. या सामन्यात दोन वेळा चॅम्पियन राहिलेल्या भारताचा सामना एक वेळच्या चॅम्पियन न्यूझीलंडशी होतो आहे.

India vs New Zealand Champions Trophy 2025 Final : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना 9 मार्च रोजी दुबई येथे खेळला जात आहे. या सामन्यात दोन वेळा चॅम्पियन राहिलेल्या भारताचा सामना एक वेळच्या चॅम्पियन न्यूझीलंडशी होतो आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

कर्णधार सँटनरने प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला आहे. दुखापतीमुळे मॅट हेन्री हा सामना खेळत नाहीये. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज नाथन स्मिथला संधी देण्यात आली आहे. त्याच वेळी, भारतीय कर्णधार रोहित शर्मा संघात कोणता बदल केला नाही. भारतीय संघ पाचव्यांदा या मेगा स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे, तर न्यूझीलंड संघ तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. याशिवाय, दोन्ही संघ 25 वर्षांनंतर मेगा स्पर्धेच्या जेतेपदाच्या सामन्यात आमनेसामने येतील. टीम इंडियाने वनडे सामन्यात सलग 15व्यांदा टॉस हरला आहे.

भारत आणि न्यूझीलंडची Playing XI 

न्यूझीलंड संघाची प्लेइंग इलेव्हन : विल यंग, ​​रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), काइल जेमिसन, विल्यम ओरोर्क, नाथन स्मिथ

भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया विजयाच्या रथावर आहे. संघ आतापर्यंत अपराजित राहिला आहे, तर न्यूझीलंड संघाला लीगच्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. जर आपण चालू आवृत्तीतील साखळी सामन्यांमधील दोन्ही संघांच्या कामगिरीवर नजर टाकली तर, भारताने 3 पैकी 3 सामने जिंकले होते. त्याच वेळी, न्यूझीलंड संघाने 3 पैकी 2 सामने जिंकले आहे. भारतीय संघ 6 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर होता, तर न्यूझीलंडचा संघ 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर होता. त्याच वेळी, भारताने उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला, तर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून जेतेपदाच्या सामन्यात स्थान मिळवले.

भारत आणि न्यूझीलंड हेड टू हेड रेकॉर्ड 

आकडेवारीनुसार, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा वरचष्मा दिसत आहे. दोन्ही संघांमध्ये 119 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. भारताने 61 सामने जिंकले आहेत आणि न्यूझीलंडने 50 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील 7 सामन्यांचा निकाल लागला नाही, तर एक सामना बरोबरीत सुटला. भारताने घरच्या मैदानावर 31 सामने, बाहेरच्या ठिकाणी 14 सामने, तटस्थ ठिकाणी 16 सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडच्या संघाने घरच्या मैदानावर 26 सामने, बाहेरच्या ठिकाणी 8 सामने आणि तटस्थ ठिकाणी 16 सामने जिंकले आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विजय आणि पराभवाचा विक्रम बरोबरीचा आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत फक्त दोन सामने झाले आहेत. यामध्ये भारताने एक सामना जिंकला आहे, तर न्यूझीलंड संघानेही एक सामना जिंकला आहे. दुबईमध्ये खेळल्या जाणाऱ्या विजेतेपदाच्या सामन्यात विजय मिळवणारा संघ आघाडी मिळवून विजेताही बनेल.

हे ही वाचा -

India vs New Zealand Final Champions Trophy 2025: रोहित शर्माच्या निवृत्तीचे गूढ वाढले; चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर काय करणार?, एक दिवसाआधी हिंटही दिली!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Sooryavanshi : दोन सामने फ्लॉप, अन् आता...; वैभव सूर्यवंशीच्या पुढच्या सामन्याबाबत मोठी अपडेट; कधी, कुठे अन् कोणाविरुद्ध? जाणून घ्या A टू Z
दोन सामने फ्लॉप, अन् आता...; वैभव सूर्यवंशीच्या पुढच्या सामन्याबाबत मोठी अपडेट; कधी, कुठे अन् कोणाविरुद्ध? जाणून घ्या A टू Z
Ind vs Afg 1st ODI Live Update : धर्मशाळेत वरुणराजाची 'धो-धो' बॅटिंग; ना नाणेफेक, ना खेळपट्टीचा अंदाज; रोहित शर्मासह दोन्ही संघांचे डोळे आकाशाकडे, जाणून घ्या Live अपडेट्स
धर्मशाळेत वरुणराजाची 'धो-धो' बॅटिंग; ना नाणेफेक, ना खेळपट्टीचा अंदाज; रोहित शर्मासह दोन्ही संघांचे डोळे आकाशाकडे, जाणून घ्या Live अपडेट्स
Ind VS Afg 1st ODI Live Update : पहिल्या वनडेआधी वाईट बातमी; धर्मशालेत काळे ढग, भारत-अफगाणिस्तान होणार रद्द?, जाणून घ्या अपडेट्स
पहिल्या वनडेआधी वाईट बातमी; धर्मशालेत काळे ढग, भारत-अफगाणिस्तान होणार रद्द?, जाणून घ्या अपडेट्स
Ind vs Pak T20 World Cup 2026 : अरुंधति IN, रेणुका OUT... टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा सामना, अशी असेल भारताची Playing XI
अरुंधति IN, रेणुका OUT... टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा सामना, अशी असेल भारताची Playing XI

व्हिडीओ

Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव
Women Power : महिलांनी घेतला निर्धार अन् बदललं गावाचं चित्र; 'महिला शक्ती कमांडो'ची यशोगाथा | Special Report
Jamun & Drought : जांभळाचा सडा आणि दुष्काळाचा इशारा? निसर्ग काय सांगतोय? | Special Report
Crime Patrol Style Theft Special Report : 'क्राईम पेट्रोल' पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs Afghanistan, 1st ODI: टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
Rohit Sharma Video: रोहित शर्माचा दुर्दैवाचा फेरा सुरुच, दुखापतीतून सावरून आला, पहिल्याच ओव्हरमध्ये मनगटाच्या वेदनेनं तळमळला, पुन्हा उभा राहिला, पण जम बसण्यापूर्वीच रन आऊटने घात केला
Video: रोहित शर्माचा दुर्दैवाचा फेरा सुरुच, दुखापतीतून सावरून परतला, पहिल्याच ओव्हरमध्ये मनगटाच्या वेदनेनं तळमळला, पुन्हा उभा राहिला, पण जम बसण्यापूर्वीच रन आऊटने घात केला
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी
लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी
India vs Afghanistan, 1st ODI: अफगाणिस्तानचे टीम इंडियासमोर 195 धावांचे आव्हान; गुरनूर ब्रार अन् हर्ष दुबे पदार्पणातच 3-3 विकेट घेत चमकले; गुरबाजने 48 चेंडूत शतक ठोकत 21 वर्षांचा विक्रम मोडला
अफगाणिस्तानचे टीम इंडियासमोर 195 धावांचे आव्हान; गुरनूर ब्रार अन् हर्ष दुबे पदार्पणातच 3-3 विकेट घेत चमकले; गुरबाजने 48 चेंडूत शतक ठोकत 21 वर्षांचा विक्रम मोडला
देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा
देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा
मन हेलावणारी घटना, घरातून सांगून निघाले, दूधसागर नदीपात्रात बुडून चार जणांचा मृत्यू; तीन सख्ख्या भावांचा समावेश
मन हेलावणारी घटना, घरातून सांगून निघाले, दूधसागर नदीपात्रात बुडून चार जणांचा मृत्यू; तीन सख्ख्या भावांचा समावेश
Rahmanullah Gurbaz: अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज धर्मशालात पावसानंतर टीम इंडियावर धो धो कोसळला! अवघ्या 48 चेंडूत शतक ठोकत केला भीम पराक्रम, भारताविरुद्ध शाहीद आफ्रिदीनंतर दुसरं वेगवान शतक
अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज धर्मशालात पावसानंतर टीम इंडियावर धो धो कोसळला! अवघ्या 48 चेंडूत शतक ठोकत केला भीम पराक्रम, भारताविरुद्ध शाहीद आफ्रिदीनंतर दुसरं वेगवान शतक
Embed widget