Ind vs Nz 5th T20 Update : टी-20 वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाचा 'विराट' विजय; न्यूझीलंडला लोळवून मालिका 4-1 ने खिशात
IND vs NZ 5th T20I Score : भारत आणि न्यूझीलंड हे संघ शनिवारी पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पाचव्या व अंतिम सामन्यात आमनेसामने येणार आहेत.
किरण महानवरLast Updated: 31 Jan 2026 10:35 PM

पार्श्वभूमी
IND vs NZ 5th T20I Score : भारत आणि न्यूझीलंड हे संघ शनिवारी पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पाचव्या व अंतिम सामन्यात आमनेसामने येणार आहेत. हा सामना तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय...More
IND vs NZ 5th T20I Score : भारत आणि न्यूझीलंड हे संघ शनिवारी पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पाचव्या व अंतिम सामन्यात आमनेसामने येणार आहेत. हा सामना तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिले तीन सामने जिंकत भारताने आधीच मालिका आपल्या नावावर केली आहे. मात्र चौथ्या सामन्यात न्यूझीलंडने जोरदार पुनरागमन करत भारताचा 50 धावांनी पराभव केला होता.टीम इंडिया हा अखेरचा सामना जिंकून टी-20 विश्वचषक 2026 मोहिमेला आत्मविश्वासाने सुरुवात करण्याच्या तयारीत आहे. आगामी टी-20 विश्वचषकासाठी भारत हा प्रबळ दावेदार मानला जात असून, संघ आपल्या विजेतेपदाचे संरक्षण करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
Ind vs Nz 5th T20 Update : टी-20 वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाचा 'विराट' विजय; न्यूझीलंडला लोळवून मालिका 4-1 ने खिशात
भारताने पाचव्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा 46 धावांनी पराभव करून पाच सामन्यांची टी-20 मालिका 4-1 अशी जिंकली.
शनिवारी तिरुवनंतपुरम येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
ईशान किशनच्या शतक आणि सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने 20 षटकांत पाच बाद 271 धावा केल्या.
प्रत्युत्तर, न्यूझीलंडचा संघ 225 धावांवर ऑलआउट झाला, ज्यामध्ये फिन अॅलनने 80 धावा केल्या.