India Playing 11 vs New Zealand 5th T20 : टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिले तीन सामने जिंकत मालिकेत अजेय आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर न्यूझीलंडने जोरदार पुनरागमन करत चौथ्या टी-20 सामन्यात भारताचा पराभव केला. आता टी-20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी दोन्ही संघांमधील हा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाणार आहे. पाचवा टी-20 सामना कधी आणि कुठे होणार, सामन्याची वेळ आणि थेट प्रसारणाची संपूर्ण माहिती जाणून घ्या...

Continues below advertisement

वर्ल्ड कपआधी शेवटचा पेपर! जसप्रीत बुमराह OUT, तर..., 

न्यूझीलंड संघ आपल्या विजयी संघरचनेत बदल करण्याची शक्यता कमी असून पाहुणा संघ प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल न करता मैदानात उतरू शकतो. दुसरीकडे, भारतीय संघ रोटेशन धोरणानुसार जसप्रीत बुमराह किंवा अर्शदीप सिंग यांपैकी एका खेळाडूला विश्रांती देऊ शकतो, कारण मागील टी-20 सामन्यात दोघेही एकत्र खेळले होते. मागील सामन्यात रवि बिश्नोई आणि हर्षित राणा गोलंदाजीत महागडे ठरले होते, तरीही हे दोघे या सामन्यात खेळताना दिसू शकतात. पहिल्या सामन्यात दुखापत झाल्याने अक्षर पटेलची या सामन्यात पुनरागमन करण्याची शक्यता कमी आहे.

Continues below advertisement

भारत विरुद्ध न्यूझीलंड पाचवा टी-20 सामना कधी होणार?

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पाचवा टी-20 सामना शनिवार, 31 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे.

सामना कुठे खेळवला जाणार?

हा सामना तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाईल.

सामना किती वाजता सुरू होणार?

पाचवा टी-20 सामना सायंकाळी 7 वाजता सुरू होईल. नाणेफेक सायंकाळी 6:30 वाजता होणार आहे.

थेट प्रसारण कुठे पाहता येईल?

भारत विरुद्ध न्यूझीलंड पाचव्या टी-20 सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.

लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?

या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग जिओहॉटस्टार अ‍ॅपवर उपलब्ध असेल.

भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), रिंकू सिंग, शिवम दुबे, अभिषेक शर्मा, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, रवि बिश्नोई, हर्षित राणा.

न्यूझीलंड संघ : जेम्स नीशम, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), डॅरिल मिचेल, ईश सोढी, जेकब डफी, मिचेल सँटनर (कर्णधार), मार्क चॅपमन, मॅट हेन्री, मायकेल ब्रेसवेल, लॉकी फर्ग्युसन, काइल जेमिसन, टिम सायफर्ट (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, फिन अ‍ॅलन, रचिन रवींद्र, झॅकरी फॉक्स, बेवॉन जेकब्स.

हे ही वाचा -

WPL 2026 Playoffs Scenario : RCB ची थेट फायनलमध्ये धडक! WPL प्लेऑफसाठी उरलेल्या 4 संघांचे गणित काय?, मुंबई OUT...?