IND vs NZ 2nd ODI : मालिका 1-1 ने बरोबरीत! डॅरिल मिचेलने भारताचा गेम फिरवला, दुसऱ्या वनडेत न्यूझीलंडचा दणदणीत विजय

IND vs NZ 2nd ODI Update Marathi News : राजकोट येथे आज निरंजन शाह स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे.

किरण महानवरLast Updated: 14 Jan 2026 09:41 PM

पार्श्वभूमी

India vs New Zealand 2nd ODI Update : राजकोट येथे आज निरंजन शाह स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. पहिला सामना जिंकत टीम इंडियाने मालिकेत...More

IND vs NZ 2nd ODI : मालिका 1-1 ने बरोबरीत! डॅरिल मिचेलने भारताचा गेम फिरवला, दुसऱ्या वनडेत न्यूझीलंडचा दणदणीत विजय








डॅरिल मिचेलच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर, तसेच विल यंग आणि ग्लेन फिलिप्स यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतावर 7 विकेट्सनी मात केली.


केएल राहुलच्या शतकाच्या बळावर भारताने 50 षटकांत 7 विकेट्सच्या मोबदल्यात 284 धावा केल्या.


286 धावांचे लक्ष्य गाठताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली आणि त्यांनी लवकरच दोन विकेट्स गमावल्या.


मात्र त्यानंतर डॅरिल मिचेल आणि विल यंग यांनी तिसऱ्या विकेटसाठी 162 धावांची भागीदारी करत सामन्याचा मार्ग पूर्णपणे किवींच्या बाजूने वळवला.


विल यंग शतकाच्या उंबरठ्यावर आऊट झाला, त्याने 98 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 87 धावा केल्या.


यानंतर मिचेलने ग्लेन फिलिप्ससोबत संयमी आणि आक्रमक खेळाचे उत्तम मिश्रण दाखवत डाव पुढे नेला आणि सामना जिंकून दिला.


मिचेलने 117 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 131 धावांची मॅच-विनिंग खेळी साकारली.


ग्लेन फिलिप्सने 25 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकार लगावत नाबाद 32 धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले.


भारताकडून हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.


या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने बरोबरी साधली असून सध्या मालिका 1-1 अशी समसमान स्थितीत आहे.