IND vs NZ 1st T20 : नागपुरात सूर्या ब्रिगेडचा कहर! अभिषेक–रिंकूचं वादळ, टी-20 वर्ल्डकपचा बिगुल वाजण्यापूर्वीच टीम इंडियाचा दणका; न्यूझीलंड पूर्णपणे गारद
India vs New Zealand 1st T20I Marathi Update : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा दौरा भारतीय क्रिकेटसाठी अनेक अर्थांनी आश्चर्यकारक होता.

पार्श्वभूमी
India vs New Zealand 1st T20I Scorecard Marathi News : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा दौरा भारतीय क्रिकेटसाठी अनेक अर्थांनी आश्चर्यकारक होता. टीम इंडियाला घरच्या मैदानावर एक मजबूत संघ मानले...More
भारताने पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा 48 धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
बुधवारी नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने अभिषेक शर्मा (84) आणि रिंकू सिंग (44*) यांच्या स्फोटक खेळींच्या जोरावर 20 षटकांत 7 बाद 238 धावा केल्या.
टी-20 सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध भारताची ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
यापूर्वी 2023 मध्ये भारताने न्यूझीलंडविरुद्ध 234/4 धावा केल्या होत्या.
प्रत्युत्तर न्यूझीलंडला त्यांच्या निर्धारित षटकांत सात बाद केवळ 190 धावा करता आल्या.
त्यांच्याकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 78 धावा केल्या.
वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.