IND vs NED Playing 11 : जसप्रीत बुमराहसह 3 स्टार खेळाडू OUT, नेदरलँड्सविरुद्ध अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग-11
IND vs NED Playing 11 : आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारतीय संघ आपला गट टप्प्यातील अखेरचा सामना नेदरलँड्सविरुद्ध खेळणार आहे.

IND vs NED Playing 11 : आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारतीय संघ आपला गट टप्प्यातील अखेरचा सामना नेदरलँड्सविरुद्ध खेळणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) येथे होणार असून, याच मैदानावर भारत सुपर-8 फेरीतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे केवळ औपचारिक लढत म्हणून नाही, तर सुपर-8 पूर्वीची अंतिम रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे.
सामन्यापूर्वी फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी मोठे संकेत दिले आहे. त्यांच्या मते, संघ व्यवस्थापन प्लेइंग इलेव्हनमध्ये फारसे बदल करण्याच्या मनःस्थितीत नाही. सुपर-8मधील महत्त्वाच्या सामन्याचा विचार करून मुख्य खेळाडूंनाच अधिक संधी देण्याचा संघाचा दृष्टिकोन आहे.
Gearing up for another epic day of #T20WorldCup action 💪
— ICC (@ICC) February 18, 2026
Broadcast details 👉 https://t.co/NPykWM7qqY pic.twitter.com/MxyujSZjL8
अर्शदीपची पुनरागमनाची शक्यता
एकमेव संभाव्य बदल म्हणून कुलदीपच्या जागी अर्शदीप सिंगला संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे. जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाईल का, याबाबत शंका व्यक्त होत असली तरी सुपर-8 पूर्वी संघाची पूर्ण ताकद आजमावण्याचा भारतीय संघाचा मानस असल्याने बुमराह खेळण्याची शक्यता जास्त मानली जाते.
सुंदर-सिराजला पुन्हा वाट पहावी लागणार?
मोहम्मद सिराजने अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात तीन बळी घेत प्रभावी कामगिरी केली होती. मात्र बुमराह परतल्यानंतर त्याला बाहेर बसावे लागले. नेदरलँड्सविरुद्धही त्याला संधी मिळण्याची शक्यता कमीच दिसते. दुखापतीनंतर संघात पुनरागमन केलेल्या वॉशिंग्टन सुंदरलाही अजून प्रतीक्षा करावी लागू शकते. तरीही, रिंकू सिंगला विश्रांती देत सुंदरला सामना सरावाची संधी दिली जाऊ शकते, अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, नेदरलँड्सचा संघ स्पर्धेतील आपला अखेरचा सामना संस्मरणीय करण्यासाठी सर्वोत्तम संयोजनासह मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : ईशान किशन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग / वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.
टी-20 विश्वचषक 2026 साठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.
हे ही वाचा -





















