IND vs ENG T20 World Cup Semi Final : 2026 च्या टी-20 विश्वचषकातील दुसऱ्या उपांत्य फेरीत आज भारत आणि इंग्लंड यांच्यात लढत रंगणार आहे. दोन्ही संघ हा सामना जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार आहेत. भारताने आतापर्यंत दोन वेळा टी-20 विश्वचषकाचा किताब जिंकला आहे, तर इंग्लंडनेही दोनदा विजेतेपद पटकावले आहे. वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Continues below advertisement

Continues below advertisement

सूर्यकुमार यादव काय म्हणाला? 

सूर्यकुमार यादव म्हणाला की, आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा विचार करत होतो. सेमीफायनल आहे, मोठा सामना आहे आणि वारा देखील आहे. दव फारसे पडेल असे वाटत नाही. विकेट चांगली दिसतेय, सर्व क्युरेटर्स आणि ग्राउंड्समन यांना श्रेय द्यायला हवं.

भारतीय संघाची प्लेइंग-11 :अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, सूर्यकुमार यादव , तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.

इंग्लंड संघाची प्लेइंग-11 :फिलिप सॉल्ट, जोस बटलर, हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, जेमी ओव्हरटन, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद.

2022 च्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताचा 10 विकेट्सने पराभव करत भारतीय चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळले होते. त्यानंतर इंग्लंडने अंतिम सामना जिंकून विजेतेपदही पटकावले होते. त्यामुळे आजच्या सामन्यात त्या पराभवाचा हिशेब चुकता करण्याची सुवर्णसंधी टीम इंडियाकडे आहे. मात्र कागदोपत्री पाहता इंग्लंडचा संघ खूप मजबूत दिसत असल्याने आजचा सामना अत्यंत रोमांचक होण्याची शक्यता आहे.

वानखेडे स्टेडियमची पिच रिपोर्ट

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी साधारणपणे फलंदाजांसाठी पोषक मानली जाते. मात्र या सेमीफायनल सामन्यासाठी तयार केलेल्या पिचवर हलकी हिरवी गवताची झाक दिसून येत आहे. तरीही भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्केल यांनी या सामन्यात धावांचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

याच मैदानावर गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्ध अभिषेक शर्माने दमदार शतक ठोकत सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे आजही भारताला आपल्या सलामीवीराकडून तसाच स्फोटक खेळ पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.

वर्ल्ड कपमधील हेड-टू-हेड

टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 5 वेळा आमनेसामने सामना झाला आहे. यापैकी तीन वेळा भारताने विजय मिळवला आहे, तर दोन वेळा इंग्लंडने भारतीय संघाला पराभूत केले आहे. या दोन्ही संघांची विश्वचषकातील शेवटची भिडंत 2024 मध्ये झाली होती. त्या वेळी भारताने इंग्लंडला तब्बल 68 धावांनी पराभूत करत दमदार विजय मिळवला होता.

हे ही वाचा -

Daren Sammy News : आज, उद्या, पुढचा आठवडा, काहीतरी...; डॅरेन सॅमी संतापला, वेस्ट इंडिजचा संघ भारतात अडकला, काय घडलं?