Ind vs Eng 5th Test Day 3 : ओव्हल कसोटीचा तिसरा दिवस संपला, शेवटच्या चेंडूवर सिराजने इंग्लंडला दिला मोठा धक्का, भारताने दिले 374 धावांचे लक्ष्य

England vs India 5th Test Day 3 Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ओव्हलची लढत आता अत्यंत रोचक वळणावर येऊन ठेपली आहे.

किरण महानवरLast Updated: 02 Aug 2025 10:21 PM

पार्श्वभूमी

England vs India 5th Test Day 3 Live Score Latest Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ओव्हलची लढत आता अत्यंत रोचक वळणावर येऊन ठेपली आहे. या चुरशीच्या सामन्याची विशेषता म्हणजे...More

दुसऱ्या डावात टीम इंडियाचं 396 वर पॅकअप, इंग्लंडला मिळाले इतक्या धावांचे लक्ष्य, जाणून घ्या अपडेट

यशस्वी जैस्वालचे शतक (118 धावा) आणि आकाशदीप (66 धावा), रवींद्र जडेजा (53 धावा) आणि वॉशिंग्टन सुंदर (53 धावा) यांच्या दमदार अर्धशतकांमुळे भारतीय संघाने पाचव्या कसोटीत इंग्लंडसमोर 374 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पहिल्या डावात 23 धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर, केनिंग्टन ओव्हल येथे खेळल्या जाणाऱ्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीच्या दुसऱ्या डावात टीम इंडियाने 396 धावा केल्या.