IND vs ENG, Ravindra Jadeja : कर्णधार रोहित शर्मानंतर अष्टपैलू रवींद्र जाडेजा यानंही राजकोट कसोटीमध्ये शतक ठोकलेय. 3 बाद 33 अशा दैयनीय परिस्थितीमध्ये रवींद्र जाडेजा यानं भारताचा डाव सावरला. रवींद्र जाडेजा यानं 198 चेंडूमध्ये शतक ठोकलं. शतकानंतर रवींद्र जाडेजानं आपल्या खास शैलीत सेलिब्रेशन केले. रवींद्र जाडेजाचं कसोटीमधील हे चौथं शतक होय. अतिशय खराब स्थितीमध्ये जाडेजानं संयमी फलंदाजी करत शतकाला गवसणी घातली.

  






रोहित - जाडेजानं डाव सावरला, द्विशतकी भागिदारी


3 बाद 33 अशी भारताची खराब स्थिती झाली होती. या परिस्थितीत रोहित शर्माने रवींद्र जाडेजाच्या साथीने भारताच्या डावाला आकार दिला. पहिल्या सत्रात विकेट न फेकता दोघांनी संयमी फलंदाजी केली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात दोघांनीही इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. दुसऱ्या सत्रात या जोडीने 92 धावा वसूल केल्या. रवींद्र जाडेजाने कर्णधार रोहित शर्माला संयमी साथ दिली. लोकल बॉय जाडेजा यानं परिस्थिती पाहून फलंदाजी केली. रवींद्र जाडेजा आणि रोहित शर्मा यांनी 329 चेंडूमध्ये 204 धावांची भागिदारी केली.  इंग्लंड विरोधात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील ही सर्वात मोठी भागिदारी आहे. याआधी झालेल्या दोन्ही कसोटीमध्ये भारतीयांना शतकी भागिदारीही रचता आली नव्हती. रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजा यांनी द्वशतकी भागिदारी करत भारताच्या डावाला आकार दिला.