Ind vs Eng 3rd T20I Mohammed Shami Returns : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर खेळला जात आहे. या मालिकेत टीम इंडिया सध्या 2-0ने आघाडीवर आहे. त्याच वेळी टीम इंडियाने मालिकेतील तिसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग-11 मध्ये मोठा बदल केला आहे. भारतीय संघाच्या प्लेइंग-11 मध्ये भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे पुनरागमन झाले आहे. यामुळे भारतीय चाहत्यांची 14 महिन्यांची प्रतीक्षा संपली आहे. मोहम्मद शमीने यापूर्वी 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता.

Continues below advertisement

मोहम्मद शमी प्लेइंग-11 मध्ये परतला

2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपदरम्यान मोहम्मद शमीला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो टीम इंडियाच्या बाहेर होता. यानंतर, फेब्रुवारी 2024 मध्ये त्याला घोट्याची शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्यानंतर त्याने देशांतर्गत क्रिकेट खेळून आपल्या तंदुरुस्तीची टेस्ट घेतली आणि टीम इंडियामध्ये परतला. आता तो प्लेइंग-11 मध्ये परतला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मोहम्मद शमीचीही भारतीय संघात निवड झाली आहे. अशा परिस्थितीत, शमीला त्याचा फॉर्म परत मिळवण्यासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे.

Continues below advertisement

दुसरीकडे, शमी बऱ्याच काळानंतर भारतीय संघासाठी टी-20 सामना खेळण्यासाठी आला आहे. 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर तो पहिल्यांदाच भारताकडून टी-20 सामना खेळत आहे. या सामन्यापूर्वी मोहम्मद शमीने टीम इंडियासाठी फक्त 23 टी-20 सामने खेळले आहेत. या काळात त्याने 8.94 च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या आहेत आणि फक्त 24 बळी घेतले आहेत. त्याच्या टी-20 मध्ये परतण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याची फिटनेस जाणून घेणे. तो काही काळापासून देशांतर्गत क्रिकेट खेळत होता. पण या काळात त्याच्या गुडघ्यात थोडीशी सूज आली होती, ज्यामुळे त्याचे टीम इंडियात पुनरागमन देखील लांबले.

भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन : संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ध्रुव जुरेल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती.

इंग्लंड संघाची प्लेइंग इलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), बेन डकेट, फिल साल्ट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी स्मिथ, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, मार्क वूड आणि आदिल रशीद.

हे ही वाचा -

Jasprit Bumrah : बुम बुम बुमराहच्या शिरपेचात मानाचा तुरा, ICC कडून दिल्या जाणाऱ्या मानाच्या पुरस्काराने होणार सन्मान!