IND vs BAN 2nd ODI: मेहंदी हसन मिराजच्या (Mehidy Hasan Miraz) महत्त्वपूर्ण शतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशच्या संघानं भारतासमोर (India vs Bangladesh) 272 धावांचं लक्ष्य ठेवलंय. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशचा संघर्ष करताना दिसला. बांगलादेशच्या संघानं निर्धारित 50 षटकात सात विकेट्स गमावून भारतासमोर 272 धावांचं लक्ष्य ठेवलं. भारताकडून मोहम्मद सिराज (Mohammed Siraj), वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि उमरान मलिकनं (Umran Malik) दमदार गोलंदाजी केली. 


ट्वीट-






 


मेहंदी हसनची महत्त्वपूर्ण खेळी
नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशच्या संघाची सुरुवात झाली. बांगलादेशच्या संघानं दुसऱ्याच षटकात पहिली विकेट गमावली. मोहम्मद सिराजनं अनामुल हकला एलबीडब्लू करून मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. पावर प्लेमध्ये बांगलादेशच्या संघानं दोन विकेट गमावून 44 धावा केल्या. उमरान मलिकनं त्याच्या स्पेलमधील दुसऱ्या षटकात शांतोला क्लीन बोल्ड करून बांगलादेशच्या संघाला तिसरा धक्का दिला. सुंदर वॉशिंग्टन सुंदरनं शाकीब हल हसनला झेल बाद केलं. शाकीब अल हसनला 20 चेंडूत 8 धावा करत्या आल्या. बांगलादेशच्या डावातील 19 व्या षटकात वॉशिंग्टननं रहीम (12 धावा) आणि अफीफच्या (0 धाव) रुपात बांगलादेशच्या दोन फलंदाजाला माघारी धाडलं. तर, उमरान मलिकनं महमूदुल्लाहला आऊट करून भारताला सातवं यश मिळवून दिलं. पण एका बाजूनं विकेट पडत असताना महेंदी हसननं  नाबाद 100 धावा) संघाचा डाव सावरला आणि बांगलादेशच्या संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवलं.


भारताची प्लेइंग इलेव्हन: 
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, मोहम्मद सिराज, उमरान मलिक. 


बांगलादेशती प्लेइंग इलेव्हन:
 नजमुल हुसेन शांतो, लिटन दास (कर्णधार), अनामूल हक, शकीब अल हसन, मुशफिकुर रहीम (विकेटकिपर), महमुदुल्ला, अफिफ हुसेन, मेहदी हसन मिराज, नसुम अहमद, इबादोत हुसेन, मुस्तफिजुर रहमान. 


हे देखील वाचा-


Rohit Sharma Injured: भारताला मोठा धक्का! फिल्डिंगदरम्यान रोहित शर्माच्या हाताला दुखापत; मैदानातून थेट रुग्णालयात, एक्स-रेही काढणार