IND vs AUS, Test : भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू आर. अश्विन (R Ashwin) भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs Aus) यांच्यातील आगामी चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत (IND vs AUS Test Series) आपल्या नावावर मोठी कामगिरी नोंदवू शकतो. या मालिकेत केवळ 7 विकेट्स घेऊन तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज बनू शकतो. सध्या ही जागा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहच्या ताब्यात आहे. हरभजन सिंगने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 18 सामन्यांच्या 35 डावांत 95 बळी घेतले आहेत. तर आर अश्विनने समान सामन्यांच्या 34 डावात 89 विकेट घेतल्या आहेत. अशा स्थितीत 9 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत हरभजनला या बाबतीत मागे टाकण्याची सुवर्णसंधी अश्विनकडे आहे. या बाबतीत दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळे आघाडीवर आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 111 कसोटी बळी घेतले आहेत.
 


अश्चिन कमाल फॉर्मात


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चारही सामन्यांमध्ये आर अश्विनचा प्लेईंग-11 मध्ये समावेश होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. याचं एक मोठे कारण म्हणजे अश्विन आवश्यकतेनुसार गोलंदाजीसोबतच बॅटनेही दमदार कामगिरी करू शकतो. अनेक वेळा त्याने आपल्या फलंदाजीने भारताला विजय मिळवून दिला आहे. अशा स्थितीत त्याला इतर फिरकी अष्टपैलू खेळाडूंपेक्षा प्राधान्य मिळू शकतं. तसंच भारतात होणाऱ्या या कसोटी सामन्यांमध्ये फिरकीपटूंनाही चांगली मदत मिळते. अशा परिस्थितीत अश्विनने चारपैकी दोन कसोटीही खेळल्या तर तो हरभजनला सहज मागे सोडू शकतो.


अश्विन हा भारताचा दुसरा सर्वात यशस्वी कसोटी गोलंदाज 


आर अश्विनने आतापर्यंत 88 कसोटी सामने खेळले आहेत. येथे त्याने 166 डावात 449 विकेट घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. अनिल कुंबळे 619 विकेट्ससह पहिल्या स्थानावर आहे. अश्विन एकूण कसोटी क्रिकेटमध्ये विकेट घेण्याच्या बाबतीत 9व्या स्थानावर आहे. येथे श्रीलंकेचा दिग्गज फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन 800 विकेट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे.


ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ (India’s squad for first 2 Tests vs Australia) -


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकिपर), ईशान किशन (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जाडेजा, मोहम्मद सिराज, उमेश यादव. जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव 


हे देखील वाचा-