Ravindra Jadeja Controversy : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs Aus) यांच्यात सुरु बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 स्पर्धेतील पहिला सामना नागपुरात सुरु आहे. या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताच्या रवींद्र जाडेजाने ऑस्ट्रेलियाची संपूर्ण मधली फळी उद्ध्वस्त केली. ज्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ 177 धावांवर सर्वबाद झाला. दरम्यान ऑस्ट्रेलियन मीडियाला हे सहन झालं नाही आणि त्यांनी जाडेजावर थेट बॉल टॅम्परिंगचा गंभीर आरोप केला आहे. ज्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरनेही एक मीम ट्विट करुन ऑस्ट्रेलियन मीडियासह ऑस्ट्रेलियन क्रिकेटची खिल्ली उडवली आहे.


भारताने डीआरएसमध्येही छेडछाड केल्याचा ऑस्ट्रेलियन मीडियाचा आरोप


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याच्या पहिल्याच दिवशी जवळपास 6 महिन्यांनंतर दुखापतीतून परतलेल्या जाडेजाने एम. लबुशेन आणि स्टीव्ह स्मिथसह पाच दमदार ऑस्ट्रेलियन खेळाडूंना बाद केलं, ज्यामुळे त्याचा संघ केवळ 177 धावांवर ऑलआऊट झाला. जगातील नंबर वन कसोटी संघ ऑस्ट्रेलियाला अशी कामगिरी सहन झाली नाही आणि तेथील प्रसारमाध्यमांनी एकामागून एक अनेक आरोप करायला सुरुवात केली. गेल्या अनेक दिवसांपासून ऑस्ट्रेलियन मीडिया भारतातील खेळपट्टीबाबत बरेच आरोप करत होती. नागपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फॉक्स क्रिकेट या वाहिनीने सर्वप्रथम खेळपट्टीवर प्रश्न उपस्थित केले होते. ही खेळपट्टी पाहुण्या संघासाठी योग्य नसल्याचं ते म्हणत होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियन मीडियाने आणखी एक आरोप केला जेव्हा त्यांचा सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजा याला थर्ड अंपायरने आऊट घोषित केलं. जेव्हा उस्मानला तिसऱ्या पंचाने डीआरएसद्वारे आऊट दिलं तेव्हा ऑस्ट्रेलियन मीडियाचा आरोप होता की भारताने डीआरएसमध्ये देखील छेडछाड केली आहे.


जाडेजा क्रीम लावताना दिसला आणि ऑस्ट्रेलियाने बॉल टॅम्परिंगचा आरोप केला...


त्यानंतर सामन्यादरम्यान जाडेजा त्याच्या बोटांना कोणतीतरी क्रीम लावताना दिसून आला ज्यावरुन ऑस्ट्रेलियाने त्याच्यावर बॉल टॅम्परिंगचा आरोप केला. जाडेजाने नंतर याबद्दल उत्तर देत त्याची बोटं दुखत असल्याने तो बाम लावत होता असं म्हटलं आहे. पण ऑस्ट्रेलियन मीडियाने सर्वची शहानिशा न करता थेट बॉल टॅम्परिंगचा गंंभीर आरोप जाडेजावर लावला.


वसीम जाफरकडून ऑस्ट्रेलियन संघासह मीडियाची खिल्ली


या दरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरनेही ऑस्ट्रेलियन क्रिकेटसह मीडियाची काहीशी मस्ती घेत आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन एक मीम ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्याने फॉक्स क्रिकेटने ट्वीट केलेल्या व्हिडीओसह मीम शेअर केला आहे. या मीममध्ये लिहिलं आहे की, "हे रडणार हे मला माहित होतं, पण इतक्या लवकर रडणार हे वाटलं नव्हतं."


पाहा ट्वीट-






 


हे देखील वाचा-