Rohit Sharma & Gautam Gambhir: भारताच्या एकदिवसीय संघाचे कर्णधारपद शुभमन गिलकडे दिल्यामुळे रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) व्हिलन ठरला होता. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी पर्थमध्ये दाखल झाला होता. ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यापासून रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली हे दोघे कसून सराव करताना दिसत आहेत. नेटमध्ये एकमेकांच्या बाजूला फलंदाजीचा सराव करणारे रोहित आणि विराट कोहली (Virat Kohli) यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. मात्र, यावेळी पर्थच्या मैदानातील आणखी एका गोष्टीने भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. पर्थच्या मैदानात सराव सुरु असताना प्रशिक्षक गौतम गंभीर आणि रोहित शर्मा हे एकमेकांशी बोलताना दिसले. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची क्रिकेट कारकीर्द वेळेपूर्वी संपवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा आरोप गौतम गंभीर याच्यावर सातत्याने होत आहे. त्यामुळे गौतमी गंभीर आणि रोहित शर्मा यांच्यात प्रचंड तणाव असल्याचीही चर्चा होती. मात्र, पर्थच्या मैदानात सरावावेळी गंभीर आणि रोहित शर्मा एकमेकांशी बोलताना दिसून आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

Continues below advertisement

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या छायाचित्रांमध्ये गौतमी गंभीर मोठ्या उत्साहाने रोहित शर्माची भेट घेताना दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गंभीरने आधी रोहित शर्माला हात मिळवला. त्यानंतर त्याच्या खांद्यावर हात ठेवूनही गंभीर मैदानात उभा होता. यावेळी गंभीर आणि रोहित शर्मा यांची बराच काळ चर्चाही झाली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कोणत्याही परिस्थितीत आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवणे, हे रोहित शर्मा याच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये रोहित शर्मा याने स्वत:वर प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याने स्वत:चे वजन घटवले आहे. तसेच गेल्या काही दिवसांमध्ये त्याने फलंदाजीचा कसून सराव केला आहे. 

यापूर्वी रोहित शर्मा म्हटले की, पोट सुटलेला आणि फिटनेसचा अभाव असलेला खेळाडू अशी प्रतिमा समोर यायची. मात्र, रोहित शर्माने तब्बल 10 किलो वजन कमी करुन जबरदस्त ट्रान्सर्फोमेशन केले आहे. 2027 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी रोहित शर्मा हा त्याच्या वाढत्या वजनामुळे फिट बसणार नाही, अशी टीका सातत्याने केली जायची. परंतु, रोहित शर्मा याने स्वत:मध्ये प्रचंड मोठा बदल घडवला आहे. आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने चांगली कामगिरी केल्यास आगामी विश्वचषकासाठी संघातील त्याची दावेदारी भक्कम होऊ शकते. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्मा काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आणखी वाचा

रोहित-विराट IN, जैस्वाल OUT...ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात कशी असेल टीम इंडियाची Playing XI, पाहा संपूर्ण संघ!