नवी दिल्ली : भारताचा संघ वेस्ट इंडिज विरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. या दौऱ्यावर भारत तीन सामन्यांची वनडे मालिका आणि 5 सामन्यांची टी 20 मालिका होणार आहे. बीसीसीआयनं या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. वनडे टीमचं कर्णधारपद शुभमन गिलकडे देण्यात आलं आहे. तर, टी 20 च्या टीमचं कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे ठेवण्यात आलं आहे. भारताचा वनडे संघ पाहिल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटूनं पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अरोन फिंच यानं दोन्ही संघांपैकी कोणता संघ मालिका जिंकणार हे देखील सांगितलंय.
Aaron Finch Prediction : अरोन फिंचनं मालिका कोण जिंकणार हे सांगितलं?
भारतानं ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे संघाचं कर्णधारपद शुभमन गिलकडे सोपवलंय तर विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघे संघात आहेत. अरोन फिंच यानं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दमदार मालिका पाहायला मिळणार आहे, असं म्हटलं. मात्र, ऑस्ट्रेलियाच मालिका जिंकेल, असं फिंचनं म्हटलं.
रोहित शर्माच्या नेतृ्त्वात भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली क्रिकेटच्या मैदानात भारतीय संघाकडून खेळताना दिसलेले नाहीत. रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं यापूर्वीच कसोटी आणि टी 20 मधून निवृ्त्ती घेतली आहे. श्रेयस अय्यरला वनडे मालिकेसाठी उपकर्णधार करण्यात आलं आहे. ही मालिका 19 ते 25 ऑक्टोबर दरम्यान होईल.
अरोन फिंच यानं आयसीसी डिजीटलसोबत बोलताना म्हटलं की "ही खूप शानदार मालिका होईल, भारताविरुद्ध मालिका नेहमी चांगली होते आणि मला वाटतं विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वश्रेष्ठ कामगिरी करतो.कागदावर ही लढाई मोठी होते कारण सामना बरोबरीचा होतो. मात्र मी म्हणेन ऑस्ट्रेलिया मालिका 2-1 अशी जिंकेल. पण पूर्ण विश्वासानं नाही कारण भारत चांगली टीम आहे, ही मालिका पाहण्यासारखी होईल, असं अरोन फिंच म्हणाला.
वनडेसाठी भारताचा संघ
शुभमन गिल- कर्णधार, श्रेयस अय्यर- उपकर्णधार, विराट कोहली, रोहित शर्मा, अक्षर पटेल, के.एल. राहुल नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल.
ट्वेन्टी-20 मालिकेसाठीचा भारतीय संघ
सूर्यकुमार यादव- कर्णधार, अभिषेक शर्मा, शुभमन गिल- उपकर्णधार,तिलक वर्मा,नितीश कुमार रेड्डी,शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीकरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर
वनडे मालिकेचं वेळापत्रक
19 ऑक्टोबर - पहिली वनडे (पर्थ)
23 ऑक्टोबर- दुसरी वनडे (एडिलेड)
25 ऑक्टोबर- तिसरी वनडे (सिडनी)