IND vs AUS 5th T20 Play Stops : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटचा सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळला जात होता. मात्र या सामन्यादरम्यान एक अनपेक्षित आणि धक्कादायक घटना घडली. खेळ फक्त 4.5 षटकांपर्यंतच झाला आणि अचानक सामना थांबवण्यात आला. अंपायरांनी दोन्ही संघांना डगआउटमधून थेट ड्रेसिंग रूममध्ये जाण्याच्या सूचना दिल्या. यामुळे खेळाडूंसह चाहत्यांमध्येही एकच खळबळ उडाली.

Continues below advertisement

अचानक सामना का थांबवला गेला?

खरं तर, ब्रिस्बेनमध्ये हवामान बिघडल्यामुळे सामना स्थगित करण्याचा निर्णय अंपायरांनी घेतला. मैदानावर विजेच्या कडकडाटासह वीज चमकू लागली होती. अंपायर शॉन क्रेग यांनी आढावा घेतल्यानंतर तात्काळ सर्व खेळाडूंना मैदान सोडण्यास सांगितले. हवामान विभागाने वादळी पावसाची गंभीर चेतावणी दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. रिपोर्टनुसार, आधी मुसळधार पावसाचे संकेत स्पष्ट होते. 

Continues below advertisement

चाहत्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य

खेळाडूंसोबतच मैदानात उपस्थित असलेल्या हजारो चाहत्यांच्या सुरक्षिततेकडेही विशेष लक्ष देण्यात आले. स्टेडियमच्या खालच्या भागातील प्रेक्षकांना तत्काळ वरच्या बसायच्या जागी हलवण्यात आले. अनेक फॅन्स विजेच्या आणि पावसाच्या भीतीने आसरा घेताना दिसले. ब्रिस्बेनमध्ये हवामानातील अशी अचानक उलथापालथ नवी नाही, त्यामुळेच ऑस्ट्रेलियात खेळाडू आणि चाहत्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत सामना लगेच थांबवला गेला.

खराब हवामानामुळे 4.5 षटकांनंतर सामना थांबवण्यात आला. पाऊस, वादळ आणि विजांच्या भीतीमुळे पंचांनी सामना थांबवला. भारत आणि ऑस्ट्रेलियन दोन्ही खेळाडू आपापल्या डगआउट्समध्ये परतले आहेत. 4.5 षटकांनंतर भारताचा स्कोअर 52 धावा आहे. गिल सध्या 16 चेंडूत 29 धावा करत आहे आणि अभिषेक 13 चेंडूत 23 धावा करत आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया शेवटचा सामना रद्द झाला तर कोणाला मिळणार ट्रॉफी?

सध्या भारत मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. जर हा सामना पावसामुळे रद्द झाला, तर भारत पाच सामन्यांची ही मालिका जिंकेल. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला, तर तिसरा आणि चौथा सामना सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने शानदार कामगिरी करत जिंकले. AccuWeather च्या माहितीनुसार, शनिवारी ब्रिस्बेनमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहील. दुपारनंतर वाऱ्यांचा वेग वाढेल आणि संध्याकाळी पावसाची शक्यता अधिक आहे. 

पावसाचा अंदाज (स्थानिक वेळेनुसार) :

  • संध्याकाळी 5 वाजता : 47% पावसाची शक्यता
  • संध्याकाळी 6 वाजता : वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
  • संध्याकाळी 7 ते 8 वाजता : 49% पावसाची शक्यता
  • रात्री 9 ते 10 वाजता : पावसाची शक्यता 60% पर्यंत वाढेल
  • रात्री 11 वाजता : 49% पावसाची शक्यता

हे ही वाचा -

Team India Hong Kong Sixes : भुरट्या संघांकडून टीम इंडियाचे सलग तीन पराभव, नेपाळ, कुवेत आणि यूएईने एकाच दिवसात हरवलं