= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पावसाच्या सरी आल्या धावून, गाबामधील टी20 सामना गेला वाहून; ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाने टी-20 मालिका 2-1 ने जिंकली पाचवा टी-20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.
भारताच्या फलंदाजीदरम्यान 4.5 षटकांनंतर खेळ थांबवण्यात आला.
पंचांनी सामना अनिर्णित घोषित केला.
अशाप्रकारे टीम इंडियाने पाच सामन्यांची टी20 मालिका 2-1 अशी जिंकली.
मालिकेतील पहिला सामनाही पावसामुळे रद्द करण्यात आला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Ind vs Aus 5th T20 Live Score : गाबामध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस, कधी सुरू होणार सामना? जाणून घ्या अपडेट्स ब्रिस्बेनमध्ये पावसाचा जोर वाढला आहे आणि खराब हवामानामुळे सामना अद्याप सुरू झालेला नाही.
या सामन्यात टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली आहे.
चाहते सामना लवकरात लवकर सुरू व्हावा अशी अपेक्षा करतील.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Ind vs Aus 5th T20 Live Score : अभिषेक-गिल जोडीची तुफानी सुरुवात; पण अचानक थांबवला सामना, नेमकं काय घडलं? जाणून घ्या अपडेट्स खराब हवामानामुळे 4.5 षटकांनंतर सामना थांबवण्यात आला.
पाऊस, वादळ आणि विजांच्या भीतीमुळे पंचांनी सामना थांबवला.
भारत आणि ऑस्ट्रेलियन दोन्ही खेळाडू आपापल्या डगआउट्समध्ये परतले आहेत.
4.5 षटकांनंतर भारताचा स्कोअर 52 धावा आहे.
गिल सध्या 16 चेंडूत 29 धावा करत आहे आणि अभिषेक 13 चेंडूत 23 धावा करत आहे.
अभिषेकला मिळाले दोन जीवनदान
अभिषेकला पहिल्या चार षटकात दोन जीवनदान मिळाले. त्याने पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर शानदार चौकार मारला. त्यानंतर, पुढच्या चेंडूवर, तो आणखी एक मोठा फटका मारण्यासाठी गेला. पण, चेंडू मिड-ऑफवर उभ्या असलेल्या मॅक्सवेलकडे गेला, परंतु त्याने झेल घेतला नाही. यामुळे अभिषेकला पहिला जीवनदान मिळाला. त्यानंतर, चौथ्या षटकात अभिषेकने नाथन एलिसच्या फाईन लेगकडे शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू द्वारशुइसच्या हातातून सुटला. तो तेव्हा 11 धावांवर होता.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Ind vs Aus 5th T20 Live Score : भारतीय संघाची प्लेइंग-11 अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Ind vs Aus 5th T20 Live Score : ऑस्ट्रेलिया संघाची प्लेइंग-11 मिशेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, टिम डेव्हिड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, अॅडम झम्पा, बेन द्वारशुइस.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Ind vs Aus 5th T20 Live Score : ऑस्ट्रेलियाने जिंकली नाणेफेक भारताविरुद्ध पाचव्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.