Ind vs Aus 3rd Test Day 1 Rain : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील तिसरा सामना आजपासून गाबा येथे सुरू झाला आहे, ज्यामध्ये रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. खेळपट्टीचा रंग पाहून हिटमॅनने हा निर्णय घेतला. पावसामुळे खेळात दोन वेळा व्यत्यय आला असून ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात चांगली झाली आहे. पावसामुळे पहिल्या सत्रात तासाहून अधिक वेळ वाया गेला. आता दुसरे सत्र वेळेवर सुरू झाले नाही. अजूनही मुसळधार पाऊस सुरूच आहे. त्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द होऊ शकतो.
गाबाचे मैदान बनले तलाव...
ब्रिस्बेनमध्ये खेळपट्टी झाकण्यात आली आहे आणि बाकीचे मैदान पूर्णपणे उघडे आहे. सततच्या पावसामुळे मैदानावर पाणी साचले आहे, ते पूर्णपणे कोरडे करणे हे मैदान कर्मचाऱ्यांसाठी मोठे आव्हान असेल. ब्रॉडकास्टिंग टीमचा भाग असलेले माजी भारतीय फलंदाज सुनील गावसकर यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, आज आणखी एक तासाचा खेळ पाहायला मिळाला तर ही मोठी गोष्ट असेल. याचा स्पष्ट अर्थ आता पहिल्या दिवसाचा खेळ रद्द होण्याचा धोका आहे. दीड तासाहून अधिक काळ लोटला असून अद्याप पाऊस थांबलेला नाही. त्यामुळे मैदान कोरडे करून पुन्हा खेळ सुरू करणे कठीण आहे.
पहिल्या सत्रात दोनदा पडला पाऊस
सामना वेळेवर सुरू झाला, पण 5.3 षटकांचा खेळ होताच पाऊस आला आणि अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ खेळ थांबवावा लागला. यानंतर पुन्हा खेळ सुरू झाला तेव्हा सुमारे आठ षटकांनंतर पाऊस पुन्हा परतला. यावेळी पावसाने सामना पुन्हा सुरू होऊ दिला नाही आणि पंचांनी उपाहाराची घोषणा केली. या संपूर्ण कसोटीवर हवामान खात्याने आधीच धोक्याचा इशारा दिला आहे. कसोटीच्या शेवटच्या दिवसापर्यंत पावसाची शक्यता आहे. यातील पहिल्याच दिवशी ही शक्यता खरी ठरली आहे.
हे ही वाचा -