Australia vs India, 3rd T20I : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा टी20 सामना होबार्ट येथे खेळला जात आहे. सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सध्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. मालिकेतील आशा जिवंत ठेवण्यासाठी भारताला आजचा सामना जिंकणे अत्यावश्यक आहे. या सामन्यात टीम मॅनेजमेंटने काही कठोर निर्णय घेत तीन बदल केले आहेत. संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर-बल्लेबाज म्हणून जितेश शर्मा आज मैदानात उतरला आहे.
हर्षित राणा देखील बाहेर
अभिषेक शर्मा सोबत हर्षित राणाने दुसऱ्या टी20 मध्ये थोडासा प्रभावी ठरला होता. मात्र त्याची गोलंदाजी साधारण राहिली. अतिरिक्त फलंदाज पर्याय म्हणून त्याला संघात ठेवण्यात आलं होतं, पण त्या निर्णयावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. अखेर तिसऱ्या सामन्यात हर्षितलाही बाहेर बसावं लागलं आहे.
भारतीय संघात 3 मोठे बदल
आजच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये भारताने तीन बदल केले आहेत. अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा यांना संधी देण्यात आली आहे. तर संजू सॅमसन, हर्षित राणा आणि कुलदीप यादव यांना आज विश्रांती देण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या संघात एक बदल
ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल झाला आहे. मागील सामन्याचा हिरो जोश हेजलवूड आता या मालिकेचा भाग नाही. तो फक्त पहिल्या दोन सामन्यांसाठी संघात होता. त्याच्या जागी आज सीन एबॉट खेळत आहे.
मालिकेची स्थिती
सध्या ऑस्ट्रेलिया 1-0 ने आघाडीवर आहे. जर आजही ऑस्ट्रेलिया जिंकला, तर भारत मालिकेतील विजयाची आशा गमावेल. अशावेळी भारत पुढील दोन सामने जिंकला, तरी मालिकेचा निकाल फक्त 2-2 असा बरोबरीत राहील. होबार्टच्या या मैदानावर ऑस्ट्रेलियाने याआधी खेळलेले सर्व 5 टी20 सामने जिंकले आहेत. भारत आज या मैदानावर पहिल्यांदाच टी20 सामना खेळत आहे.
भारतीय संघाची प्लेइंग-11 : शुभमन गिल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, अक्षर पटेल, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया संघाची प्लेइंग-11 : मिशेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, मिशेल ओवेन, मार्कस स्टोइनिस, मॅट शॉर्ट, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, शॉन अॅबॉट, मॅट कुह्नेमन.
हे ही वाचा -