IND vs AUS, ODI Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना (IND vs AUS 3rd ODI) आज खेळवला जात असून नुकतीच नाणेफेक (Toss update) पार पडली आहे. ऑस्ट्रेलिया संघाने आज टॉस जिंकला असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दमदार फलंदाजी करुन मोठी धावसंख्या करण्याचा कांगारुंचा डाव आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने 5 गडी राखून जिंकला असून दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने तब्बल 10 विकेट्सच्या फरकाने जिंकला. ज्यामुळे आजचा सामना निर्णायक आहे. सामना जिंकणारा संघ मालिका जिंकेल. त्यामुळे मालिकाविजयासाठी दोन्ही संघ शर्थीचे प्रयत्न करणार हे नक्की...
दोन्ही संघाच्या प्लेईंग 11 चा विचार करता भारतानं दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील संघच मैदानात उतरवल आहे. पण ऑस्ट्रेलियाने मात्र संघात काही बदल केले आहेत कॅमेरॉन ग्रीन फिट नसल्यामुळे विश्रांतीवर असून डेव्हिड वॉर्नर संघात परतला आहे. अॅश्टन एगरलाही संधी दिली असून नॅथन एलिसला विश्रांती दिली गेली आहे.
कशी आहे दोन्ही संघाची प्लेईंग 11?
ऑस्ट्रेलिया (प्लेईंग इलेव्हन) : डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, अॅश्टन अगर, शॉन अॅबॉट, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा
भारत (प्लेईंग इलेव्हन) : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
कधी, कुठे पाहाल सामना?
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) हा तिसरा एकदिवसीय सामना (IND vs AUS 3rd) भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरु होईल. सामन्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच 1 वाजता टॉस होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1 या चॅनेलवर दुपारी 1.00 वाजता सुरु होईल. तसंच या सामन्याचं ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टार या अॅप आणि वेबसाइटवरुन पाहता येईल.
हे देखील वाचा-