IND vs AUS 2nd Test : ॲडलेडमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांची जबरदस्त कामगिरी पाहायला मिळत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधार रोहित शर्माचा निर्णय आतापर्यंत करी चुकाचा ठरला आहे. विराट कोहली, केएल राहुल, शुभमन गिल आणि रोहित शर्मासारखे दिग्गज फलंदाज फ्लॉप ठरले. रोहित शर्मा एलबीडब्ल्यू होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.  


रोहित 2193 दिवसांनी सहाव्या क्रमांकावर आला, पण...


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्माची बदललेली फलंदाजी पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. वर्षानुवर्षे ओपनिंग करणारा 2193 दिवसांनंतर हिटमॅन 6 व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला. याच बॅटिंग पोझिशनमधून त्याने टेस्ट बॅटिंग करिअरला सुरुवात केली होती. पण तो या सामन्यात काही खास करू शकला नाही. रोहित शर्मा तीन धावा करून बाद झाला. त्याला स्कॉट बोलंडने एलबीडब्ल्यू आऊट केले. रोहितशिवाय बोलंडने शुभमन गिलला बाद केले. त्यामुळे कर्णधार रोहित शर्माचा हा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा निर्णय पण चुकीचा ठरला.






टीम इंडिया संकटात!


पिंक बॉल कसोटीत नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांचा विक्रम ॲडलेडमध्ये चांगला दिसत आहे. पण टीम इंडियाची कहाणी याच्या उलट आहे. धावफलकात 100 धावांची भर पडण्यापूर्वीच भारतीय संघाची टॉप ऑडर कोलमडली. अवघ्या 18 धावांत टीम इंडियाने राहुल, विराट, गिल आणि रोहितच्या विकेट्स गमावल्यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली.  






ॲडलेड कसोटीत भारताला पहिले 5 झटके 87 धावांनी बसले. स्कोअर बोर्डने खाते उघडण्यापूर्वीच भारताची पहिली विकेट यशस्वी जैस्वालची होती. जैस्वाल सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याच्या विकेटनंतर केएल राहुल आणि गिल यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी झाली आणि भारतीय डावाला काहीशी गती मिळेल असे वाटत होते. पण त्यानंतर ॲडलेडमध्ये संपूर्ण टॉप ऑर्डर कोसळण्यास वेळ लागला नाही.


हे ही वाचा -


Nz vs Eng 2nd Test : पहिल्या दिवशी 15 विकेट! हॅरी ब्रूक अन् पोपने न्यूझीलंडच्या WTC फायनलच्या आशांना दिला धक्का


Ind vs Aus Pink Ball Test : पहिलाच चेंडू अन् ज्याची भीती तेच घडलं, मिचेल स्टार्क नावाचं वादळ घोंघावलं; जैस्वाल पुन्हा शून्यावर बाद!