IND vs AUS 1st T20I Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून टी-20 चा थरार रंगणार; मोबाईल अन् टीव्हीवर Live Streaming कुठे पाहायला मिळणार?, A टू Z माहिती
IND vs AUS 1st T20I Live Streaming: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-20 सामना आज खेळला जाईल. भारताने यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका 2-1 अशी गमावली होती.

IND vs AUS 1st T20I Live Streaming: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS 1st T20) यांच्यातील पहिला टी-20 सामना आज खेळला जाईल. हा सामना ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथे होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया ही टी-20 मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला दौऱ्यावर आहे. भारताने यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका 2-1 अशी गमावली होती. त्यामुळे, भारतीय संघ कॅनबेरामध्ये विजयाने सुरुवात करण्यासाठी प्रयत्नशील असेल. (IND vs AUS 1st T20I Live Streaming)
T20 Mode 🔛 and we are ready! 🇮🇳
— BCCI (@BCCI) October 29, 2025
🎥 Hear from captain Surya Kumar Yadav as #TeamIndia are all set for the 5️⃣-match T20I Series 💪#AUSvIND pic.twitter.com/A6IUHbenoW
Ind vs Aus 1st T20 कुठे खेळला जाईल? (Ind vs Aus 1st T20)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला T20 सामना (IND vs AUS T20) कॅनबेरा येथील मनुका ओव्हल स्टेडियमवर खेळला जाईल.
सामना किती वाजता सुरू होईल? (Ind vs Aus 1st T20 Time)
भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी नाणेफेक दुपारी 1:15 वाजता भारतीय वेळेनुसार होईल. नाणेफेक झाल्यानंतर अर्धा तासानंतर, भारतीय वेळेनुसार दुपारी 1:45 वाजता सामना सुरू होईल.
टीव्हीवर कुठे लाईव्ह पाहता येईल? (Ind vs Aus 1st T20 Live Streaming)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी-20 सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल. तुम्ही सामना डीडी स्पोर्ट्सवर देखील लाईव्ह पाहू शकता.
कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रीम केले जाईल? (Ind vs Aus 1st T20 Live Streaming OTT)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रीम केला जाईल.
टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ: (Team India Full Squad vs Australia)
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, रिंकू सिंग आणि वॉशिंग्टन सुंदर.
टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ: (Team Australia vs Team India)
मिच मार्श (कर्णधार), शॉन अॅबॉट, ट्रॅव्हिस हेड, झेवियर बार्टलेट, टिम डेव्हिड, बेन द्वारशीस, नॅथन एलिस, जोश इंगलिस (यष्टीरक्षक), जोश हेझलवुड, मॅथ्यू कुहनेमन, मिशेल ओवेन, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस आणि अॅडम झांपा.
भारत सध्याचा टी-20 विश्वविजेता- (Team India T20 World Cup 2024)
भारतीय संघ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असाधारणपणे चांगली कामगिरी करत आहे. भारत सध्याचा टी-20 विश्वविजेता आहे. टीम इंडियाने 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकला. त्यावेळी रोहित शर्मा कर्णधार होता. आता, सूर्यकुमार यादव टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने अलीकडेच टी-20 आशिया कप 2025 जिंकला.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेचे वेळापत्रक- (Ind vs Aus T20 Schedule)
पहिला टी20 : 29 ऑक्टोबर – मनुका ओव्हल, कॅनबेरा
दुसरा टी20 : 31 ऑक्टोबर – मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, मेलबर्न
तिसरा टी20 : 2 नोव्हेंबर – ब्लंडस्टोन अरेना, होबार्ट
चौथा टी20 : 6 नोव्हेंबर – गोल्ड कोस्ट
पाचवा टी20 : 8 नोव्हेंबर – ब्रिस्बेन





















