एक्स्प्लोर

Ind vs Aus 1st ODI Team India Probable Playing XI: रोहित-विराट IN, जैस्वाल OUT...ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात कशी असेल टीम इंडियाची Playing XI, पाहा संपूर्ण संघ!

Ind vs Aus 1st ODI Team India Probable Playing XI: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी भारताची प्लेईंग इलेव्हन कशी असेल, जाणून घ्या...

Ind vs Aus 1st ODI Probable Playing XI: भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus) यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 19 ऑक्टोबर रोजी पर्थमध्ये खेळला जाईल. विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) जवळजवळ नऊ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहेत. दोघेही आता फक्त एकदिवसीय सामन्यांच्या स्वरूपात खेळतात. रोहित शर्माच्या जागी आता शुभमन गिलची एकदिवसीय संघाचा कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली शुभमन गिलच्या (Shubhman Gill) नेतृत्वात खेळताना दिसतील. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी भारताची प्लेईंग इलेव्हन (Ind vs Aus 1st ODI Probable Playing XI) कशी असेल, जाणून घ्या...

रोहित शर्मा आणि शुभमन गिल सलामीला येणार- (Rohit Sharma And Shubhman Gill Opner)

पहिल्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिल आणि रोहित शर्मा डावाची सुरुवात करतील हे जवळजवळ निश्चित आहे. अशा परिस्थितीत, यशस्वी जैस्वाल पहिल्या सामन्यातून बाहेर बसावे लागू शकते. शुभमन गिल आणि रोहित शर्मा भारताला मजबूत सुरुवात देऊ शकतात. रोहित शेवटचा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 76 धावा केल्या होत्या.

तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली- (Virat Kohli Ind vs Aus)

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल. ऑस्ट्रेलियातील उसळत्या खेळपट्ट्यांवर कोहली चांगली कामगिरी करू शकतो. कोहलीने आतापर्यंत 302 एकदिवसीय सामन्यांमध्ये 290 डावांत 14,181 धावा केल्या आहेत.  कोहलीला आता फक्त 54 धावा करायच्या आहेत. विराट कोहलीने 54 धावा केल्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कुमार संगकाराला मागे टाकून विराट कोहली दुसऱ्या स्थानावर पोहोचेल.

केएल राहुल यष्टिरक्षक म्हणून संधी- (KL Rahul Ind vs Aus)

केएल राहुल यष्टीरक्षक म्हणून खेळू शकतो, कदाचित तो 5 व्या क्रमांकावर फलंदाजी करेल. ध्रुव जुरेलला पहिल्या एकदिवसीय सामन्यातून वगळण्याची शक्यता आहे.

अक्षर आणि कुलदीप फिरकी गोलंदाज म्हणून खेळतील- (India vs Australia)

अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांना फिरकी गोलंदाज म्हणून संघात समाविष्ट केले जाऊ शकते आणि अक्षर आक्रमक फलंदाजी देखील करू शकतो. कुलदीप यादवने अलीकडेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत चांगली कामगिरी केली आणि दुसऱ्या कसोटीत सामनावीराचा पुरस्कार जिंकला. या परिस्थितीत, वॉशिंग्टन सुंदरला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते.

वेगवान गोलंदाज कोण असतील? (Mohmmad Siraj Arshdeep Singh)

मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा सारखे वेगवान गोलंदाज प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात. पर्थच्या खेळपट्टीवर सिराज हा प्रभावी खेळाडू ठरू शकतो. पहिल्या एकदिवसीय सामन्यात हर्षित राणाला प्लेईंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी भारताची संभाव्य Playing XI: (Ind vs Aus 1st ODI Probable Playing XI)

रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा.

भारताचा ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक- (Ind vs Aus ODI And T20 Schedule)

पहिला एकदिवसीय सामना: 19 ऑक्टोबर (ऑप्टस स्टेडियम)

दुसरा एकदिवसीय सामना: 23 ऑक्टोबर (अ‍ॅडलेड ओव्हल)

तिसरा एकदिवसीय सामना: 25 ऑक्टोबर (एससी ग्राउंड)

पहिला टी-20: 29 ऑक्टोबर (मनुका ओव्हल)

दुसरा टी-20: 31 ऑक्टोबर (एमसीजी)

तिसरा टी-20: 2 नोव्हेंबर (बेलेरिव्ह ओव्हल)

चौथा टी-20: 6 नोव्हेंबर (हेरिटेज बँक स्टेडियम)

पाचवा टी-20: 8 नोव्हेंबर (गब्बा स्टेडियम)

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीचा भारतीय संघ- (Team India ODI Squad vs Australia)

शुभमन गिल- कर्णधार, श्रेयस अय्यर- उपकर्णधार, विराट कोहली, रोहित शर्मा, अक्षर पटेल, के.एल. राहुल नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल.

संबंधित बातमी:

Rohit Sharma Shubhman Gill Ind vs Aus: एकदिवसीय कर्णधारपदी निवड...रोहित शर्मा समोर येताच शुभमन गिलने काय केलं?, VIDEO 

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले
कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले
मोठी बातमी :  शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर 'त्या' प्रकरणात गैरसमजुतीने गुन्हे, पुणे पोलिसांचा अजब कारभार!
मोठी बातमी : शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर 'त्या' प्रकरणात गैरसमजुतीने गुन्हे, पुणे पोलिसांचा अजब कारभार!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2025 | सोमवार
Pankaja Munde: वैद्यनाथ कारखाना देताना मला प्रचंड वेदना झाल्या; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देत पंकजा मुंडे गहिवरल्या
वैद्यनाथ कारखाना देताना मला प्रचंड वेदना झाल्या; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देत पंकजा मुंडे गहिवरल्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Blast : ‘आयुष्यात इतका मोठा आवाज ऐकला नाही’, लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटावर प्रत्यक्षदर्शींची प्रतिक्रिया
Delhi Blast: 'मृतांचा आकडा वाढण्याची भीती', राजधानी हादरली; Mumbai मध्ये हाय अलर्ट
Delhi Blast Alert: 'खिडकी हिल गई', लाल किल्ला स्फोटानंतर Delhi हादरली, राजधानीत High Alert
Delhi Blast: 'संपूर्ण Delhi हाय अलर्टवर', Lal Qila स्फोटानंतर दहशतीचे वातावरण
Delhi Blast: लाल किल्ल्याजवळ कारमध्ये शक्तिशाली स्फोट, दिल्लीत हाय अलर्ट जारी, घातपाताचा संशय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले
कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले
मोठी बातमी :  शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर 'त्या' प्रकरणात गैरसमजुतीने गुन्हे, पुणे पोलिसांचा अजब कारभार!
मोठी बातमी : शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर 'त्या' प्रकरणात गैरसमजुतीने गुन्हे, पुणे पोलिसांचा अजब कारभार!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2025 | सोमवार
Pankaja Munde: वैद्यनाथ कारखाना देताना मला प्रचंड वेदना झाल्या; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देत पंकजा मुंडे गहिवरल्या
वैद्यनाथ कारखाना देताना मला प्रचंड वेदना झाल्या; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देत पंकजा मुंडे गहिवरल्या
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ, सोन्याचे दर वाढणार की घसरणार, सोनं खरेदी करावं की थांबावं?
सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ, सोन्याचे दर वाढणार की घसरणार, सोनं खरेदी करावं की थांबावं?
Ajinkya Naik : मुख्यमंत्री, शरद पवार आणि आशिष शेलारांना मी योग्य खेळाडू वाटलो; MCA अध्यक्षपदावर बिनविरोध निवड, अजिंक्य नाईक यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री, शरद पवार आणि आशिष शेलारांना मी योग्य खेळाडू वाटलो; MCA अध्यक्षपदावर बिनविरोध निवड, अजिंक्य नाईक यांची प्रतिक्रिया
शरद पवारांची 'ती' गुगली अन् अजिंक्य नाईक बनले एमसीए निवडणुकीच्या मैदानात चॅम्पियन, इनसाईड स्टोरी
शरद पवारांची 'ती' गुगली अन् अजिंक्य नाईक बनले एमसीए निवडणुकीच्या मैदानात चॅम्पियन, इनसाईड स्टोरी
लोकसभेला बिनसलं, पण स्थानिकला जमलं! सतेज पाटील अन् राजू शेट्टींची गट्टी; कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी अन् महाविकास आघाडी एकत्र लढणार
लोकसभेला बिनसलं, पण स्थानिकला जमलं! सतेज पाटील अन् राजू शेट्टींची गट्टी; कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी अन् महाविकास आघाडी एकत्र लढणार
Embed widget