Ind vs Afg Test Day-3 : भारताचा अफगाणिस्तानवर मोठा विजय; डेब्यू टेस्टमध्ये मानव सुथारची फिरकीची जादू, तिसऱ्या दिवशी काय घडलं?
India vs Afghanistan Test Day 3 Live Cricket Score Today : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या एकमेव कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. दुसऱ्या
LIVE

Background
India vs Afghanistan Test Day 3 Live Cricket Score Today : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या एकमेव कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाने सामन्यावर पूर्ण वर्चस्व मिळवत विजयाच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. आता अफगाणिस्तानला फॉलोऑनची नामुष्की टाळण्यासाठी मोठी झुंज द्यावी लागणार आहे.
दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी करत पहिल्या डावात 8 बाद 564 धावांवर डाव घोषित केला. भारतीय फलंदाजांच्या आक्रमक आणि संयमी खेळीमुळे अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना मोठा त्रास सहन करावा लागला.
यानंतर भारतीय गोलंदाजांनीही आपली छाप पाडत अफगाणिस्तानच्या फलंदाजीची सुरुवातीलाच पडझड केली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत अफगाणिस्तानने 39.5 षटकांत 5 बाद 113 धावा केल्या होत्या. त्यामुळे ते अजूनही भारताच्या धावसंख्येपेक्षा 451 धावांनी मागे आहेत.
तिसऱ्या दिवशी अफगाणिस्तानच्या उर्वरित फलंदाजांवर संघाला सावरण्याची मोठी जबाबदारी असेल. दुसरीकडे, भारतीय संघाची नजर मोठी आघाडी मिळवून सामना एकतर्फी करण्यावर असेल. त्यामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
Ind vs Afg Test Live Day-3 : भारताचा अफगाणिस्तानवर मोठा विजय; डेब्यू टेस्टमध्ये मानव सुथारची फिरकीची जादू, तिसऱ्या दिवशी काय घडलं?
मुल्लांपूर (न्यू चंदीगड) येथील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना खेळला गेला.
या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी दणदणीत पराभव करत एकतर्फी वर्चस्व गाजवले.
अफगाणिस्तानचा पहिला डाव अवघ्या 152 धावांवर आटोपला. भारताने पहिल्या डावात उभारलेल्या प्रचंड धावसंख्येमुळे यजमान संघाला 412 धावांची भक्कम आघाडी मिळाली. त्यामुळे अफगाणिस्तानवर फॉलोऑनची नामुष्की ओढवली.
दुसऱ्या डावातही अफगाण फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत. संपूर्ण संघ केवळ 112 धावांत गारद झाला आणि भारताने सामना सहज खिशात घातला.
या विजयाचा सर्वात मोठा शिल्पकार ठरला पदार्पणवीर मानव सुथार. आपल्या पहिल्याच कसोटीत त्याने प्रभावी गोलंदाजी करत अफगाणिस्तानच्या फलंदाजीची अक्षरशः दाणादाण उडवली. सुथारच्या भेदक फिरकीसमोर अफगाण फलंदाज हतबल दिसले.
भारताने या विजयासह कसोटी क्रिकेटमधील आपले वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित केले, तर मानव सुथारने शानदार पदार्पण करत भविष्यासाठी दमदार दावेदारी सादर केली.
Ind vs Afg Test Live Day-3 : भारतासमोर अफगाणिस्तानची दाणादाण! 152 धावांत गुंडाळत फॉलोऑनसाठी भाग पाडलं, मानव सुथारचा 6 विकेट्ससह कहर
मुल्लांपूर येथे सुरू असलेल्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यात टीम इंडियाने पूर्ण वर्चस्व गाजवलं आहे.
प्रथम फलंदाजी करताना भारताने 127 षटकांत 8 बाद 564 धावा करून डाव घोषित केला.
या भल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली.
भारतीय गोलंदाजांसमोर त्यांचा एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही आणि संपूर्ण संघ अवघ्या 58.4 षटकांत 152 धावांवर गारद झाला.
अफगाणिस्तानला पहिल्या डावात केवळ 152 धावा करता आल्याने भारताला तब्बल 412 धावांची आघाडी मिळाली.
त्यामुळे भारतीय संघाने अफगाणिस्तानला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला आणि पाहुण्या संघाला पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरावं लागलं.
या सामन्यात भारताचा युवा फिरकीपटू मानव सुथार खरा हिरो ठरला. त्याने अफगाणिस्तानच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवत 6 महत्त्वाचे बळी घेतले. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे अफगाणिस्तानचा डाव लवकर आटोपला.
भारताने या सामन्यावर मजबूत पकड मिळवली असून आता संघाचे लक्ष्य डावाने विजय मिळवण्याचे असेल. दुसरीकडे, फॉलोऑननंतर अफगाणिस्तानसमोर पराभव टाळण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.



















