Ind vs Afg T20 Series: भारताने काल (17 सप्टेंबर) दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये अफगाणिस्तानचा (Ind vs Afg) तिसऱ्या टी-20 सामन्यात 127 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने तीन सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकली. भारताकडून फलंदाजीत अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि संजू सॅमसन, तर गोलंदाजीत नितीश कुमार रेड्डी यांनी शानदार कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 7 गडी गमावून 221 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ 14.1 षटकांत 94 धावांवर सर्वबाद झाला. (Afghanistan vs India)

Continues below advertisement

भारताकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक धावा करताना 34 चेंडूंत 9 चौकार आणि 11 षटकारांच्या मदतीने 108 धावांची खेळी केली. त्याने अवघ्या 30 चेंडूंत शतक पूर्ण केले. यासह अभिषेक हा फुल मेंबर संघाविरुद्ध सर्वात वेगवान शतक झळकावणारा फलंदाज ठरला. संजू सॅमसनने 50 धावांची खेळी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 59 चेंडूंत 142 धावांची भागीदारी करत संघाला मजबूत सुरुवात करून दिली. अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर भारताची धावगती काहीशी मंदावली. दुसऱ्या डावात नितीश कुमार रेड्डीने भारताकडून सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याने एकाच षटकांत या विकेट्स घेतल्या. रवि बिश्नोईनेही 3 विकेट्स घेतल्या. अक्षर पटेलने 2 विकेट्स मिळवल्या, तर जसप्रीत बुमराह आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. (Afghanistan vs India)

श्रेयस अय्यरने अफगाणिस्तानचा कर्णधाराला सामूहिक फोटोसाठी केले आमंत्रित- (Afghanistan vs India T20 Series)

आपल्या सहकाऱ्यांसोबत आनंद साजरा करण्यापूर्वी, भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने अफगाणिस्तानचा कर्णधार इब्राहिम झाद्रान याला मंचावर बोलावले. अय्यरने झाद्रानला आपल्यासोबत ट्रॉफी सामायिक घेण्यासाठी निमंत्रण दिले आणि त्यानंतर या दोन्ही कर्णधारांनी ती ट्रॉफी 'चॅम्पियन्स बोर्ड'च्या दिशेने नेली. त्यानंतर, विजेत्या संघाच्या छायाचित्रासाठी भारतीय खेळाडूंसोबत उभे राहण्याचे निमंत्रणही झाद्रानला देण्यात आले. भारताने 'फ्रेंडशिप कप' आणि तिन्ही सामने जिंकले होते, तरीही अंतिम छायाचित्राच्या वेळी अफगाणिस्तानच्या कर्णधाराचा समावेशही टीम इंडियाच्या खेळाडूंनी सेलिब्रेशनदरम्यान केला. सामन्यानंतर, भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने अफगाणिस्तानचा कर्णधार इब्राहिम झाद्रान याला विजयी संघाच्या सामूहिक छायाचित्रात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले. 

Continues below advertisement

धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ पूर्णपणे फ्लॉप- (Ind vs Afg 3td T20 Mathc)

इब्राहिम झादरानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानसमोर 222 धावांचे मोठे लक्ष्य होते. सुरुवातीपासूनच त्यांच्यावर दबाव दिसून आला. 31 धावांवर गुरबाजच्या रूपाने पहिली विकेट पडली. त्याने 15 धावा केल्या. त्यानंतर अफगाणिस्तानचा संघ अक्षरशः पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. संघाने दुसरी विकेट 33 धावांवर, तिसरी 39 धावांवर, चौथी 47 धावांवर, पाचवी 70 धावांवर, सहावी 81 धावांवर, सातवी 82 धावांवर, आठवी 82 धावांवर, नववी 89 धावांवर आणि दहावी विकेट 94 धावांवर गमावली. झादरानने 25 धावांची सर्वाधिक खेळी केली. त्याच्याशिवाय एकाही फलंदाजाला 20 धावांचा टप्पा पार करता आला नाही. संघातील एकूण 7 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.

टी-20 मध्ये सर्वाधिक शतके- (Abhishek Sharma vs Afghanistan T20)

अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात अभिषेक शर्माने ऐतिहासिक शतक झळकावले. त्याने 34 चेंडूंत 108 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने चौकार आणि षटकारांच्या माध्यमातून तब्बल 102 धावा केल्या. त्याने संजू सॅमसनसोबत पहिल्या विकेटसाठी 142 धावांची भागीदारी केली. दोघांनी पॉवरप्लेमध्ये 100 धावा केल्या, जो टी-20 क्रिकेटमध्ये भारताचा पॉवरप्लेमधील सर्वात मोठा स्कोअर ठरला आहे. अभिषेकने या खेळीत 3 मोठे विक्रम केले. अभिषेक शर्माने टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. आता तो विराट कोहलीसोबत संयुक्तपणे टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा भारतीय फलंदाज बनला आहे. अभिषेकने 205 डावांमध्ये 10 शतके झळकावली आहेत, तर विराट कोहलीने 413 डावांमध्ये 10 शतके केली आहेत. त्यांच्यानंतर केएल राहुल, संजू सॅमसन आणि रोहित शर्मा यांच्या नावावर प्रत्येकी 8 शतके आहेत.

संबंधित बातमी:

भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली