IND vs AFG One-off Test Playing XI : भारतीय क्रिकेट संघ आगामी एकमेव कसोटी सामन्यात अफगाणिस्तानचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील हा सामना 6 जूनपासून न्यू चंदीगडमधील मुल्लांपूर येथील मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यापासून भारतीय संघाचा नवा कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्या नव्या पर्वाची सुरुवात होणार असल्याने सर्वांचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.

Continues below advertisement

सलामीला जैस्वाल-राहुल जोडी (India vs Afghanistan One-off Test Playing XI)

अफगाणिस्तानविरुद्धच्या या कसोटीत डावाची सुरुवात यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल ही जोडी करणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. दोघांकडून मोठ्या धावांची अपेक्षा असेल. विशेषतः राहुलवर उपकर्णधार म्हणून अतिरिक्त जबाबदारी असणार आहे.

Continues below advertisement

मधल्या फळीत पडिक्कलची एन्ट्री? (India vs Afghanistan Playing XI)

तिसऱ्या क्रमांकासाठी स्पर्धा रंगली असली तरी साई सुदर्शन याऐवजी देवदत्त पडिक्कल याला संधी मिळू शकते. डावखुरा फलंदाज असल्यामुळे संघ व्यवस्थापन त्याच्यावर विश्वास दाखवू शकते. यानंतर चौथ्या क्रमांकावर कर्णधार शुभमन गिल, तर पाचव्या क्रमांकावर यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत मैदानात उतरू शकतो. गिल आणि पंत या दोघांकडूनही मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.

अष्टपैलू खेळाडूंवर मोठी जबाबदारी (India vs Afghanista Test)

वेगवान गोलंदाजी अष्टपैलू म्हणून नितीश कुमार रेड्डी याचे स्थान जवळपास निश्चित मानले जात आहे. फलंदाजीसह गोलंदाजीतही तो संघासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. तर फिरकी अष्टपैलू म्हणून वॉशिंग्टन सुंदर आणि युवा खेळाडू हर्ष दुबे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. दोघेही फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये योगदान देऊ शकतात.

कुलदीपवर फिरकीची धुरा (India vs Afghanistan News)

फिरकी विभागात  हा भारताचा प्रमुख शस्त्र असणार आहे. अफगाणिस्तानच्या फलंदाजांना त्याच्या फिरकीचा सामना करणे सोपे जाणार नाही. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांच्यावर असेल. दोघांकडेही सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट्स घेण्याची क्षमता आहे.

अफगाणिस्तानविरुद्ध भारताची संभाव्य Playing XI (India vs Afghanistan One-off Test Playing XI) यशस्वी जैस्वाल, केएल राहुल (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्ष दुबे, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज.

या सामन्यात भारतासाठी विजय महत्त्वाचा असला, तरी नव्या नेतृत्वाखाली संघ कशी कामगिरी करतो याकडे क्रिकेटप्रेमींचे विशेष लक्ष असणार आहे. गिल-गंभीर जोडीची पहिली मोठी कसोटी अफगाणिस्तानविरुद्धच पाहायला मिळणार आहे.

हे ही वाचा -

Krunal Pandya IPL 2026 : 5 फायनल खेळला, पाचही जिंकला! RCBच्या विजेतेपदाचा ठरला 'लकी चार्म’, कोण आहे तो गेमचेंजर खेळाडू?