नवी दिल्ली: भारतासह जगभरात आयपीएलची (IPL 2024) धुम सुरु आहे. आयपीएलचं 17 वं पर्व सुरु असतानाच आयसीसीच्या वतीनं दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डानं मोठी घोषणा केली आहे. 2027 चा वनडे वर्ल्ड कप (World Cup) कुठं आयोजित केला जाणार आहे या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. आयसीसीच्या निर्णयानुसार 2027 ला वर्ल्ड कप स्पर्धा ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा तीन देश संयुक्तपणे आयोजित करणार आहेत. दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बॉब्वे हे वर्ल्डकपचं आयोजन करण्यात येणार आहे.
दक्षिण आफ्रिकेतील आठ मैदानावर या स्पर्धेतील मॅच खेळवल्या जातील. भारतात गेल्यावर्षी झालेल्या वर्ल्ड कपला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता आयसीसीचा वर्ल्ड कप आणखी रोमांचकारी बनवण्याचा प्रयत्न आहे. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बॉब्वेनं यापूर्वी वर्ल्ड कपचं आयोजन केलेलं आहे. तर, नामिबिया पहिल्यांदा वर्ल्ड कपचं आयोजन करणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बॉब्वेनं यापूर्वी 2003 वर्ल्ड कपचं आयोजनं केलं होतं.
दक्षिण आफ्रिकेत कोणत्या मैदानावर मॅचेस होणार ?
दक्षिण आफ्रिकेत 2027 च्या वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात येणार आहे.दक्षिण आफ्रिकेतील 8 मैदानांवर मॅचेसचं आयोजन केलं जाणार आहे. जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियम, प्रिटोरियामध्ये सेंच्युरियन पार्क, दर्बनमधील किंग्समीड,सेंट जॉर्ज पार्क, सुपरस्पोर्ट पार्क, न्यूलँड्स स्टेडियम, बफेलो पार्क आणि द मांगुआंग ओवलची निवड करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेटचे सीईओ फोलेत्सी मोसेकी यांनी याबाबत घोषणा केली आहे. हा निर्णय हॉटेलच्या खोल्या, विमानतळांची सुविधा या गोष्टींचा विचार करुन घेण्यात आला आहे. आमच्याकडे आयसीसीची मान्यता असलेली 11 मैदानां आहेत. अनेक विषयांचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, 2027 च्या टी वर्ल्ड कपचे आयोजक असल्यानं दक्षिण आफ्रिका आणि झिम्बॉब्वे हे स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. तिसरा आयोजक देश नामिबियाला मात्र आफ्रिकेतील पात्रता फेरीत चांगली कामगिरी करत स्पर्धेत सहभागी व्हावं लागेल. आयसीसी रँकिंग्जमध्ये पहिल्या आठ स्थानावर असलेल्या संघांना वर्ल्ड कपमध्ये थेट प्रवेश मिळतो.
2003 मध्ये काय घडलेलं?
2003 च्या दक्षिण आफ्रिकेत झालेल्या वर्ल्ड कपमध्ये भारतानं चांगली कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. भारतासमोर अंतिम फेरीतील लढतीत ऑस्ट्रेलियाचं आव्हानं होतं. ऑस्ट्रेलियानं भारताला पराभूत करत वर्ल्ड कप जिंकला होता. तर, बरोबर 20 वर्षांनी आस्ट्रेलियानं फायनलमध्ये भारताला पुन्हा एकदा पराभूत केलं होतं.
संबंधित बातम्या :