एक्स्प्लोर

ICC Womens World Cup 2025 Points Table: 3 संघ पात्र, बांगलादेश वर्ल्डकपमधून बाहेर; श्रीलंकेच्या विजयाने गुणतालिकेत उलथापालथ, टीम इंडियासाठी समीकरण काय?

ICC Womens World Cup 2025 Points Table: श्रीलंकेच्या बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर विश्वचषकाच्या गुणतालिकेत बदल झाला आहे. विश्वचषकाच्या सेमीफायनलसाठी आतापर्यंत 3 संघ क्वालिफाय झाले आहेत.

ICC Womens World Cup 2025 Points Table: महिला विश्वचषक 2025 चा 21 वा सामना (ICC Womens World Cup 2025) बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशचा 7 धावांनी पराभव केला. एकवेळ अशी होती, तेव्हा बांगलादेशला 12 चेंडूत 12 धावांची गरज होती. मात्र फक्त 9 चेंडूत सामना पूर्णपणे बदलून गेला. 49 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर बांगलादेशची पाचवी विकेट पडली आणि बांगलादेश संघाची एकूण धावसंख्या 193 धावांवर पोहोचली. त्यानंतर बांगलादेशच्या विकेट्स पडत राहिल्या आणि 50 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूपर्यंत बांगलादेशने 194 धावांवर 9 विकेट्स गमावल्या. यासह श्रीलंकेने हा सामना फक्त 7 धावांनी जिंकला. बांगलादेश या पराभवासह विश्वचषकातून बाहेर पडला आहे. श्रीलंकेच्या बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर विश्वचषकाच्या गुणतालिकेत बदल झाला आहे. विश्वचषकाच्या सेमीफायनलसाठी आतापर्यंत 3 संघ क्वालिफाय झाले आहेत. तर चौथ्या जागेसाठी अद्यापही 4 संघामध्ये चुरस (Womens World Cup 2025 Points Table) रंगली आहे. भारताला (Womens Team India) उपांत्य फेरी गाठायची असल्यास पुढील न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्धचे सामना काहीही करुन जिंकावे लागतील. 

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या 3 संघांनी उपांत्य फेरीत (Semifinal Qualification) प्रवेश मिळवला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, ऑस्ट्रेलिया 9 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी विराजमान आहे. ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. ऑस्ट्रेलियाने 5 पैकी 4 सामने जिंकलेत. तर 1 सामना पावसामुळे वाया गेला. ऑस्ट्रेलियाचा नेट रनरेट हा +1.818 असा आहे. इंग्लंड पॉइंट्स टेबलमध्ये दुसर्‍या स्थानी आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाची कामगिरी सारखीच आहे. मात्र इंग्लंडचा नेट रनरेट हा ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत थोडा कमी आहे. इंग्लंडचा नेट रनरेट हा +1.490 इतका आहे. तिसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिका आहे. दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट हा -0.440 असा आहे. दक्षिण आफ्रिकेची या स्पर्धेत पराभवाने सुरुवात झाली. मात्र दक्षिण आफ्रिकेने त्यानंतर सलग 4 सामने जिंकले.
ICC Womens World Cup 2025 Points Table: 3 संघ पात्र, बांगलादेश वर्ल्डकपमधून बाहेर; श्रीलंकेच्या विजयाने गुणतालिकेत उलथापालथ, टीम इंडियासाठी समीकरण काय?

भारतीय संघाचं सेमीफायनलचं गणित (Team India Semifinal Qualification Scenario)

इंग्लंडने भारतावर 4 धावांनी विजय मिळवत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेनंतर उपांत्य फेरीत प्रवेश करणारा तिसरा संघ ठरला आहे. आता आठ लीग सामने बाकी आहेत आणि उर्वरित पाच संघ शेवटच्या उपांत्य स्थानासाठी झुंजणार आहेत. भारताने आतापर्यंत 5 सामने खेळले असून, त्यातील दोन जिंकले आणि तीन हरले आहेत. टीम इंडियाचा नेट रनरेट +0.526 असा आहे. भारताने जर न्यूझीलंड आणि बांगलादेशचा पराभव केला, तर त्याचे 8 गुण होतील आणि तो उपांत्य फेरीत पोहोचेल. मात्र, जर पुढील दोनपैकी फक्त एकच सामना जिंकला, तर इतर संघांच्या निकालांवर त्याचे भविष्य अवलंबून राहील. 

न्यूझीलंड संघाचं सेमीफायनलचं गणित (New Zealand Semifinal Qualification Scenario)

न्यूझीलंडने आतापर्यंत 5 सामने खेळले असून, त्यातील एक जिंकले आणि दोन हरले आहेत. तर दोन पावसामुळे वाया गेले आहे. न्यूझीलंडचा नेट रनरेट -0.245 असा आहे. त्यामुळे त्यांचा भारताविरुद्धचा सामना 'करो या मरो' असा असेल. जर तो भारताकडून हरला, तर त्याचा विश्वचषक प्रवास संपेल. जर त्याने पुढील दोन्ही सामने जिंकले, तर तो उपांत्य फेरीत जाईल. भारतावर विजय मिळवला पण इंग्लंडकडून पराभव झाला, तर त्याला बांगलादेश-श्रीलंका सामन्याचा निकाल आपल्या बाजूने लागावा लागेल.

ही बातमीही वाचा:

Pakistan ODI Captain: पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा खळबळ, अचानक मोहम्मद रिझवानला कर्णधारपदावरुन हटवले, कोणाला नियुक्त केले?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
Share Market : शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Train Accident : रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा प्रवाशांना फटका, 2 प्रवाशांचा मृत्यू; जबाबदार कोण?
Morning Prime Time Superfast News : 9 AM : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 7 Nov 2025 : ABP Majha
Pune Land Scam: 'किमान सहा कोटी मुद्रांक शुल्क चुकवले', सह दुय्यम निबंधक R. B. Taru निलंबित
Mumbai Housing Scamवडाळ्याच्या Sky 31 मध्ये 100 कोटींचा घोटाळा, बिल्डर Subbaraman Vilayanurवर गुन्हा
Govt Website Down: अण्णासाहेब पाटील महामंडळाची वेबसाईट महिनाभरापासून बंद, हजारो तरुणांचे भवितव्य अंधारात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
Share Market : शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
Pune Land Scam : पुण्याच्या 40 एकर जमीन व्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल, शीतल तेजवानी,रवींद्र तारु आणि पार्थ पवारांचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्याविरोधात तक्रार
40 एकरांच्या जमीन घोटाळा प्रकरणी प्रशासनाची तिघांविरोधात तक्रार, पार्थ पवारांचा भागीदार अडकला
Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding Date: शुभ मुहूर्ताची सनई वाजली गं... रश्मिका, विजय देवरकोंडाच्या लग्नाची तारीख ठरली; आलिशाल राजवाड्यात शाही विवाहसोहळा?
शुभ मुहूर्ताची सनई वाजली गं... रश्मिका, विजय देवरकोंडाच्या लग्नाची तारीख ठरली; आलिशाल राजवाड्यात शाही विवाहसोहळा?
Sulakshana Pandit Passes Away: बॉलिवूडचा सुमधूर आवाज हरपला; सुप्रसिद्ध गायिका सुलक्षणा पंडित यांचं निधन, 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
बॉलिवूडचा सुमधूर आवाज हरपला; सुप्रसिद्ध गायिका सुलक्षणा पंडित यांचं निधन, 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
Bihar Election : बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढला, प्रशांत किशोर यांचं सत्ताधारी- विरोधकांची धाकधूक वाढवणारं वक्तव्य, म्हणाले नवी व्यवस्था...
नवी व्यवस्था येत आहे, बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढताच, प्रशांत किशोर यांचा अंदाज
Embed widget