ICC U19 Mens Cricket World Cup 2024 : आगामी आयसीसी 19 वर्षांखालील विश्वचषक (ICC U19 Mens Cricket World Cup) 2024 मध्ये पार पडणार आहे. या पुरुष क्रिकेट विश्वचषकासाठी विविध 16 देशांमध्ये पात्रता फेरी पूर्वीचे पात्रता फेरी पूर्व सामने पुढील आठवड्यात सुरू होणार आहेत. यामध्ये सहभागी होणारे अनेक देश हे अत्यंत नवखे असून क्रिकेट जगतात त्यांचं नाव अनेकांनी ऐकलं ही नासावं. यावेळी ओमानच्या अल अमेरत येथील ओमान क्रिकेट अकादमी मैदानावर आठ संघ आशिया विभाग 2 पात्रता फेरीचे सामने खेळतील. तर उर्वरीत आठ संघ नायजेरियामध्ये आफ्रिका विभाग 2 पात्रता फेरीचे सामने खेळतील.

यावेळी आशिया विभागात ओमान, बहारीन, भूतान, हाँगकाँग, कतार, सौदी अरेबिया, सिंगापूर, थायलंड या देशांचा समावेश आहेत. तर आफ्रिका विभागात केनिया, मलावी, घाना, मोझांबिक, नायजेरिया, बोत्सवाना, सिएरा लिओन, रवांडा हे देश सहभागी होणार आहेत. दरम्यान आशिया विभागातून अंतिम सामन्यात पोहोचलेले दोन्ही संघ 2023 मध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठीच्या आशिया विभाग पात्रता फेरीमध्ये कुवेत, नेपाळ, मलेशिया आणि युएई या आधीच पात्रता फेरीसाठी पात्र संघांशी दोन हात करतील. दुसरीकडे आफ्रिका विभागात फायनलला पोहोचलेले आणि तिसऱ्या स्थानावरील संघ नामिबिया, तानझानिया आणि युगांडा या पात्रता फेरीसाठी पात्र संघांशी सामने खेळतील.

कसं आहे वेळापत्रक?

दिनांक 

सामना

ठिकाण

29 सप्टेंबर, 2022

ओमान विरुद्ध भुतान

ओमान क्रिकेट अकादमी पिच 1

29 सप्टेंबर, 2022

बहारीन विरुद्ध सौदी अरेबिया

ओमान क्रिकेट अकादमी पिच 2

30 सप्टेंबर, 2022

कतार विरुद्ध सिंगापूर

ओमान क्रिकेट अकादमी पिच 1

30 सप्टेंबर, 2022

हाँगकाँग विरुद्ध थायलंड

ओमान क्रिकेट अकादमी पिच 2 

1 ऑक्टोबर, 2022

भुतान विरुद्ध बहारीन

ओमान क्रिकेट अकादमी पिच 1

1 ऑक्टोबर, 2022

सौदी अरेबिया विरुद्ध ओमान

ओमान क्रिकेट अकादमी पिच 2 

2 ऑक्टोबर, 2022

थायलंड विरुद्ध सिंगापूर

ओमान क्रिकेट अकादमी पिच 1

2 ऑक्टोबर, 2022

हाँगकाँग विरुद्ध कतार

ओमान क्रिकेट अकादमी पिच 2 

3 ऑक्टोबर, 2022

भुतान विरुद्ध सौदी अरेबिया

ओमान क्रिकेट अकादमी पिच 1

3 ऑक्टोबर, 2022

ओमान विरुद्ध बहारीन

ओमान क्रिकेट अकादमी पिच 2 

4 ऑक्टोबर, 2022

थायलंड विरुद्ध कतार

ओमान क्रिकेट अकादमी पिच 1

4 ऑक्टोबर, 2022

सिंगापूर विरुद्ध हाँगकाँग

ओमान क्रिकेट अकादमी पिच 2 

6 ऑक्टोबर, 2022

सेमीफायनल 1

ओमान क्रिकेट अकादमी पिच 1

6 ऑक्टोबर, 2022

सेमीफायनल 2 

ओमान क्रिकेट अकादमी पिच 2 

7 ऑक्टोबर, 2022

तिसऱ्या स्थानासाठी सामना

ओमान क्रिकेट अकादमी पिच 2 

7 ऑक्टोबर, 2022

अंतिम सामना

ओमान क्रिकेट अकादमी पिच 1

आफ्रिका विभागाचे सामना नायजेरायत

Date

Fixture

Venue

30 सप्टेंबर, 2022

सिएरा लिओन विरुद्ध बोत्सवाना

अबुजा पिच 1, नायजेरिया 

30 सप्टेंबर, 2022

नायजेरिया विरुद्ध रवांडा

अबुजा पिच 2, नायजेरिया 

1 ऑक्टोबर, 2022

केनिया विरुद्ध घाना

अबुजा पिच 1, नायजेरिया 

1 ऑक्टोबर, 2022

मलावी विरुद्ध मोझांबिक

अबुजा पिच 2, नायजेरिया 

2 ऑक्टोबर, 2022

बोत्सवाना विरुद्ध नायजेरिया

अबुजा पिच 1, नायजेरिया 

2 ऑक्टोबर, 2022

रवांडा विरुद्ध सिएरा लिओन

अबुजा पिच 2, नायजेरिया 

3 ऑक्टोबर, 2022

घाना विरुद्ध मोझांबिक

अबुजा पिच 1, नायजेरिया 

3 ऑक्टोबर, 2022

केनिया विरुद्ध मलावी

अबुजा पिच 2, नायजेरिया 

4 ऑक्टोबर, 2022

नायजेरिया विरुद्ध सिएरा लिओन

अबुजा पिच 1, नायजेरिया 

4 ऑक्टोबर, 2022

रवांडा विरुद्ध बोत्सवाना

अबुजा पिच 2, नायजेरिया

5 ऑक्टोबर, 2022

घाना विरुद्ध मलावी

अबुजा पिच 1, नायजेरिया 

5 ऑक्टोबर, 2022

मोझांबिक विरुद्ध केनिया

अबुजा पिच 2, नायजेरिया

7 ऑक्टोबर, 2022

सेमीफायनल 1

अबुजा पिच 1, नायजेरिया 

7 ऑक्टोबर, 2022

सेमीफायनल 2 

अबुजा पिच 2, नायजेरिया

8 ऑक्टोबर, 2022

तिसऱ्या स्थानासाठी सामना

अबुजा पिच 2, नायजेरिया 

8 ऑक्टोबर, 2022

अंतिम सामना

अबुजा पिच 1, नायजेरिया 

अंडर 19 विश्वचषकासाठी 16 संघामध्ये घमासान

आगामी आयसीसी अंडर 19 पुरूष क्रिकेट विश्वचषक 2024 मध्ये एकूण 16 संघ भाग घेणार आहेत. मागील विश्वचषक स्पर्धेत उत्तम कामगिरी करणारे 11 संघ आधीच या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये भारतासह अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, इंग्लंड, आयर्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे संघाचा समावेश आहे. तर उर्वरीत 5 जागा या वरील पात्रता स्पर्धांतून तसंच अमेरिका आणि ईस्ट आशिया पॅसफिक विभागात 2023 मध्ये होणाऱ्या पात्रता फेरीतून विजेते संघ सामिल होणार आहेत.  

हे देखील वाचा-