ICC Rankings : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला 4 विकेट्सने पराभूत केले. विराट कोहली, भारताच्या विजयाचा शिल्पकार होता. सामन्यात विराटने 84 धावा केल्या. पण, त्याचे शतक हूकले. विराटला आता या सामन्यात विजय मिळविणारा बक्षीस मिळाला आहे. आयसीसीने चॅम्पियन ट्रॉफी फायनलआधी विराट कोहलीसाठी आनंदाची बातमी दिली आहे. तर कर्णधार रोहित शर्माला दणका बसला आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत भारतीय संघाच्या खेळाडूंचे वर्चस्व दिसत आहे. या यादीमध्ये शुबमन गिल अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. गिलचे रेटिंग आता 791 आहे. तर विराट कोहलीनेही एका जागेवर उडी मारली आहे.
या यादीमध्ये माजी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अद्याप दुसर्या क्रमांकावर आहे. बाबरचे रेटिंग 770 आहे. दक्षिण आफ्रिकेच्या हेनरिक क्लासेनने (760) देखील तिसर्या क्रमांकावर आला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चमकदार फलंदाजी करणार्या विराट कोहलीने आता चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
- शुबमन गिल : 791 रेटिंग
- बाबर आझम : 770 रेटिंग्ज
- हेनरिक क्लासेन : 760 रेटिंग्ज
- विराट कोहली : 747 रेटिंग
- रोहित शर्मा : 745 रेटिंग
रोहित शर्माला दणका
भारतीय कर्णधार रोहित शर्मा 2 स्थानानी खाली घसरला आहे, तो पाचव्या क्रमांकावर आला आहे. हिटमनचे रेटिंग 745 आहे. आयर्लंडच्या हॅरी टेक्टर सहाव्या, न्यूझीलंडच्या डॅरेल मिशेल सातव्या, श्रेयस अय्यर आठव्या, चारिथ असांका नवव्या आणि अफगाणिस्तानचे इब्राहिम जाद्रान दहाव्या क्रमांकावर आहेत. टॉप -10 मध्ये 4 भारतीय फलंदाज आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये किंग कोहलीची कामगिरी
- चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आतापर्यंत विराट कोहलीची कामगिरी चांगली राहिली आहे.
- कोहली सध्या तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
- त्याने सरासरी 72.33 च्या 4 डावांमध्ये 217 धावा केल्या आहेत.
- बांगलादेशविरुद्ध कोहलीने 22 धावा केल्या.
- यानंतर, कोहलीने पाकिस्तानविरुद्ध नाबाद 100 धावा केल्या.
- किंग कोहली न्यूझीलंडविरुद्ध 11 धावा करू शकला.
- पण, विराट कोहलीने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 84 धावा केल्या.
हे ही वाचा -
