नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं बुधवारी मोठा निर्णय घेतला आहे. 2021 मध्ये झालेल्या अबु धाबी टी-10 लीगमध्ये गैरप्रकार केल्यामुळं तीन भारतीयांवर बंदी घातली हे. आयसीसीनं 7 ऑगस्टला पुणे डेविल्स संघाचा फलंदाजी प्रशिक्षक अशर झैदी,पुणे डेविल्सचे सहसंघमालक पराग संघवी आणि कृष्णकुमार कृष्णकुमार चौधरी यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय आयसीसीनं घेतला आहे. 


अशर झैदी मूळचे कराचीतील असून त्यांनी ब्रिटनचं नागरिकत्व घेतलेलं आहे. अशर झैदी यांनी इंग्लंडमधील लीगमध्ये क्रिकेट खेळलं होतं. आयसीसीनं अबु धाबी टी 10 लीगमध्ये गैरप्रकार केल्यानं अशर झैदींवर 5 वर्षांची बंदी घातली आहे.


संघवी आणि चौधरी यांच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आलेली आहे. संघवी आणि चौधरी यांनी अमिराती क्रिकेट बोर्डाच्या भ्रष्टाचार विरोधी नियमांचं उल्लंघन केल्यानं दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. 


अशर झैदीवर पाच वर्षांची बंदी


अशर झैदी, पराग संघवी आणि कृष्णकुमार चौधरी यांच्यावर 19 सप्टेंबर 2023 पासून बंदी लागू करण्यात आलेली आहे. आयसीसीच्या नियमांनुसार संघवी आणि चौधरी यांच्यावर घालण्यात आलेल्या बंदीबाबत विचार करुन  त्यांना 19 सप्टेंबर 2024 पासून ते क्रिकेटविषयक कामकाज सुरु करु शकतात. तर, दुसरीकडे अशर झैदी यांच्यावरील बंदीचा कार्यकाळ 19 स्प्टेंबर 2027 पर्यंत लागू असणार आहे. 


आयसीसीनं अमिरात क्रिकेट बोर्डाच्यावतीनं सप्टेंबर 2023 मध्ये 8 जणांवर दोषारोप ठेवण्यात आला होता. त्यामध्ये अशर झैदी, संघवी आणि चौधरी यांचादेखील समावेश होता. 


आयसीसीनं ही कारवाई 2021 मध्ये झालेल्या अबु धाबी टी 20 क्रिकेट लीग मधील गैरप्रकाराबद्दल केलेली आहे. 


दरम्यान, आयसीसीकडून वेळोवेळी क्रिकेटमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. मॅच फिक्सिंग, स्पॉट फिक्सिंग सारखी कृती केल्यास आयसीसीकडून संबंधित खेळाडूंवर अनेकदा संपूर्ण काळासाठी बंदी घातली जाते.


संबंधित बातम्या :



IND vs SL : श्रीलंकेच्या भारतावरील मालिका विजयाचं पाकिस्तान कनेक्शन समोर, जयसूर्यासोबत माजी खेळाडूनं बजावली महत्त्वाची भूमिका