T20 World Cup 2026 Bangladesh Team: आगामी टी-20 विश्वचषकातील (T20 World Cup 2026) भारतातील आपले सर्व सामने श्रीलंकेत हलवावेत, अशी मागणी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) आयसीसीकडे केली होती. मात्र बांगलादेशची ही मागणी आयसीसीने फेटाळून लावल्याची माहिती समोर आली आहे.

Continues below advertisement

आगामी पुरुष टी-20 विश्वचषकात सहभागी होण्यासाठी बांगलादेशच्या भारत दौऱ्याबाबत काल आयसीसी आणि बीसीबी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत आयसीसीने बीसीबीला सांगितले की, सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेशचे (Bangladesh Cricket Team) सामने भारताबाहेर खेळवण्याची त्यांची विनंती फेटाळण्यात येत आहे. बांगलादेशला टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी भारतात प्रवास करावा लागेल, अन्यथा त्यांना गुण गमवावे लागतील, असा इशाराही आयसीसीने दिला आहे. दरम्यान, 7 फेब्रुवारीपासून टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 

नेमकं प्रकरण काय?- (T20 World Cup 2026 Bangladesh Team)

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने गेल्या काही दिवसांआधी एक आपत्कालीन बैठक बोलावली होती. या बैठकीत भारतात होणाऱ्या सामन्यांदरम्यान खेळाडूंच्या सुरक्षेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सध्याची परिस्थिती आणि बांगलादेश सरकारकडून मिळालेल्या सल्ल्याचा विचार करता, सध्या भारतात दौरा करणे संघासाठी सुरक्षित नाही, असा निष्कर्ष बोर्डाने काढला. आधी जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार, बांगलादेशला कोलकातामध्ये तीन,तर मुंबईत एक सामना खेळायचा होता.

बांगलादेशच्या सामन्यांचे वेळापत्रक- (T20 World Cup 2026)

वेळापत्रकानुसार, बांग्लादेश 7 फेब्रुवारी रोजी वेस्ट इंडीजविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल. त्यानंतर 9 फेब्रुवारीला इटलीशी, तर 14 फेब्रुवारीला इंग्लंडविरुद्ध महत्त्वाचा सामना होणार आहे. हे तिन्ही सामने कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर खेळवले जाणार आहेत. याशिवाय, गट टप्प्यातील अखेरचा सामना बांगलादेशला नेपाळविरुद्ध मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळावा लागणार आहे.

2026 च्या T20 विश्वचषकासाठी बांगलादेशचा संघ (Bangladesh squad for T20 World Cup 2026) -

लिटन दास (कर्णधार), तनजीद हसन, परवेझ हुसेन, सैफ हसन, तौहीद हृदोय, शमीम हुसेन, नुरुल हसन, मेहदी हसन, रिशाद हुसेन, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, तंजीम हसन साकिब, तस्किन अहमद, शैफुद्दीन, शरीफुल इस्लाम. 

संबंधित बातमी:

Bangladesh T20 World Cup Squad : बांगलादेशचा आधी भारतात खेळण्यास नकार, आता थेट टी-20 वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा, कर्णधारपदी शॉकिंग निवड, पाहा चक्रावणारा Squad